घरताज्या घडामोडीमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा : रामदास आठवले

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा : रामदास आठवले

Subscribe

महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड पुकारल्याने राज्याच्या राजकारणात मोठा भुकंप झाला आहे. एकनाथ शिंदे हे विधानपरिषदेच्या निवडणुकीच्या निकालापासून नॉट रिचेबल आहेत. एकनाथ शिंदे पक्षाच्या आमदारांसह संपर्काबाहेर असल्याने चर्चांना उधाण आले आहे.

महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड पुकारल्याने राज्याच्या राजकारणात मोठा भुकंप झाला आहे. एकनाथ शिंदे हे विधानपरिषदेच्या निवडणुकीच्या निकालापासून नॉट रिचेबल आहेत. एकनाथ शिंदे पक्षाच्या आमदारांसह संपर्काबाहेर असल्याने चर्चांना उधाण आले आहे. याच पार्श्वभूमीवर विरोधीपक्षांनी आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निशाणा साधण्यास सुरूवात केली आहे. त्यानुसार, काही वेळापूर्वी मनसेच्या शलिनी ठाकरे (Shalini Thackeray) यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली होती. त्यानंतर आता केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनीही उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. (Rpi Ramdas Athawale Shivsena Eknath Shinde Cm Uddhav Thackeray Maharashtra Government)

केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी ट्विटरच्या माध्यमातून महाविकास आघाडी सरकार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. “एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीला जबरदस्त दणका दिला आहे. महाविकास आघाडीचे सरकार अल्पमतात आल्यामुळे आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा. त्यांना सत्तेवर राहण्याचा अधिकार राहिलेला नाही”, असं रामदास आठवले यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

- Advertisement -

हेही वाचा – देवेंद्र फडणवीस है तो मुमकीन है, महाराष्ट्राच्या राजकारणाला सुरूंग लावणारा अजातशत्रू

दरम्यान, एकनाथ शिंदे १५ ते ३५ आमदारांसहित सूरतमधील हॉटेलमध्ये थांबले असून त्यांची मनधरणी करण्यासाठी पक्षाकडून पूर्ण प्रयत्न सुरु आहेत. तर दुसरीकडे राज्यभरातील शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. शिवसेना भवनाबाहेर मोठ्या प्रमाणात शिवसैनिकांनी घोषणाबाजी केली.

- Advertisement -

हेही वाचा – एकनाथ शिंदेंनी ट्विटरवरून शिवसेना नाव हटवलं, पुढची भूमिका काय?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच शिवसैनिकांना जमण्याचे आदेश दिल्याची माहिती असून शक्तीप्रदर्शन केलं जाणार आहे. दुसरीकडे गुजरातमध्ये असलेल्या एकनाथ शिंदेंचे मन वळवण्यासाठी उद्धव ठाकरेंचे विश्वासू सहकारी पोहोचले आहेत. यादरम्यान वर्षा बंगल्यावर आमदार पोहोचल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दिसताच शिवसैनिकांनी घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला.


हेही वाचा – ठाण्याचा ढाण्या वाघ म्हणून प्रचलित असलेले एकनाथ शिंदे होते रिक्षा चालक, जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -