घरदेश-विदेशLive Update : भाजपची सध्या वेट अॅण्ड वॉचची भूमिका, भाजपकडे प्रस्ताव आल्यास...

Live Update : भाजपची सध्या वेट अॅण्ड वॉचची भूमिका, भाजपकडे प्रस्ताव आल्यास विचार करु – सुधीर मुनगंटीवार

Subscribe

भाजपची सध्या वेट अॅण्ड वॉचची भूमिका, भाजपकडे प्रस्ताव आल्यास विचार करु – सुधीर मुनगंटीवार


मंत्री छगन भुजबळ यांना कोरोनाची लागण

- Advertisement -

सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांची बैठक, बैठकीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, संजय राऊत उपस्थित


धर्मवीर आनंद दिघे यांच्या विचारांचा विजय, बंडखोर एकनाथ शिंदेंच नव ट्वविट

- Advertisement -


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक सुरु, गृहमंत्री आणि विनायक राऊत बैठकीला उपस्थित


बंडखोरांचा कधीही विजय होत नाही- आदित्य ठाकरे


सुप्रीम कोर्टाची पुढील सुनावणी आता 11 जुलैला

झिरवळांविरोधातील अविश्वास ठरावासाठी अधिवेशनाची गरज नाही

जर नोटीसच अधिकृत नव्हती तर 14 दिवसांचा मुद्दा येत नाही – कोर्ट

सर्वांच बोलून झाल्यावर मलाही २ मिनिटे बोलायचे आहे- महाधिवक्ता

किहोटो प्रकरणानुसार विधानसभा अध्यक्षांच्या निकालात कोर्ट हस्तक्षेप करू शकत नाही. कोर्टाला फक्त निर्देश देता येऊ शकतात.

कलम 179 अंतर्गत विधानसभा अध्यक्षांना हटवण्याची तरतूद आहे, असेही कोर्टाने म्हटले आहे.

बहुमत असेल तर उपाध्यक्ष अविश्वास प्रस्ताव फेटाळू शकतात.

कौल साहेब, तुम्ही उच्च न्यायालयात का नाही गेले?, असा प्रश्न न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी  विचारला आहे.

उपसभापतींना हटवण्याची तुमची भूमिका असताना ते पुढे जाण्यास सक्षम नाहीत, हा प्रश्न तुम्ही स्वतः उपसभापतींसमोर का मांडू शकत नाही?, असे न्यायमूर्तींनी विचारले.

शिंदे गटाच्या वकीलांनी सर्वोच्च न्यायालयाच्या संवैधानिक खंडपीठाला सांगितले की उपसभापती या मुद्द्यावर कसे पुढे जाऊ शकतात हा अधिक महत्त्वाचा मुद्दा आहे की त्यांना हटवण्याचा प्रश्न असताना ते पुढे जाऊ शकत नाहीत.

उपसभापतींनी सुरू केलेल्या अपात्रतेची कारवाई रोखण्यासाठी एकनाथ शिंदे आणि शिवसेना बंडखोर आमदारांनी दाखल केलेल्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली आहे.


उदय सामंत यांच्याकडील उच्च व तंत्र शिक्षण खाते आदित्य ठाकरे यांच्याकडे

दादाजी दगडू भुसे यांच्याकडील कृषि व माजी सैनिक कल्याण खाते तसेच संदिपान आसाराम भुमरे यांच्याकडील रोजगार हमी, फलोत्पादन खाते शंकर यशवंतराव गडाख यांच्याकडे

गुलाबराव रघुनाथ पाटील यांच्याकडील पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग खाते अनिल परब यांच्याकडे

एकनाथ शिंदे यांच्याकडील नगर विकास, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) खाते सुभाष देसाईंकडे

मंत्रीमंडळातील खात्यात फेरबदल, उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय


ईडीची नोटीस मिळाली नसल्याचा राऊत यांचा दावा

28 जूनला चौकशीला हजर राहण्याचे आदेश

जमीन घोटाळा प्रकरणी राऊत यांना आदेश

संजय राऊतांना ईडीचे समन्स


मी शेवटपर्यंत मी उद्धव ठाकरेंसोबतच राहणार

शिवसेना मजबूत आहे आणि मजबूत राहील

मरेपर्यंत मी शिवसेनेत राहणार – सुनिल राऊत


महाराष्ट्राची माती त्यांना माफ करणार नाही

शिंदे गटाची भूमीका महाराष्ट्राला पटनारी नाही

भाजप महेबूबा मूफ्तींसोबत राहू शकतो तर हे पक्ष महाराष्ट्राच्या मातीतील आहेत

कायद्याची लढाई सुरू झाली आहे- संजय राऊत


निकालानंतर राजकीय घडामोडींना येणार वेग

बंडखोर आमदारांच्या याचीकेवर आज सुनावणी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -