घरताज्या घडामोडीपुढील ३ ते ४ दिवसांत राज्यातील 'या' भागात पावसाचा जोर वाढणार

पुढील ३ ते ४ दिवसांत राज्यातील ‘या’ भागात पावसाचा जोर वाढणार

Subscribe

मुंबईसह (Mumbai) राज्यभरात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. मुंबईसह ठाण्याच्या काही परिसरात पावसाची संततधार सकाळपासून सुरू आहे.

मुंबईसह (Mumbai) राज्यभरात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. मुंबईसह ठाण्याच्या काही परिसरात पावसाची संततधार सकाळपासून सुरू आहे. अशातच पुढील ३ ते ४ दिवसांत पावसाचा जोर (Heavy Rainfall) आणखी वाढणार असल्याची शक्यात हवामान विभागाकडून (IMD) वर्तवण्यात आली आहे. तसेच पश्चिम महाराष्ट्रातही जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. (Heavy Rainfall alert in maharashtra in next 3 to 4 days)

पुढील ३ ते ४ दिवसांमध्ये दक्षिण कोकणात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे येत्या ३ ते ४ दिवसांत कोकणात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्या परिस्थितीत रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना (Sindhudurga District) पुढील दोन दिवस ऑरेंज अलर्ट (Orenge Alert) देण्यात आला आहे.

- Advertisement -

याशिवाय, पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रातही मुसळधार पावसाची शक्यता आहे. कोल्हापूर, सातारा आणि सांगली जिल्ह्यातल्या घाटमाथ्यावर उद्या आणि परवा मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

सध्यस्थितीत राज्याच्या काही भागात पावसाने दडी मारली आहे. तर काही भागात चांगला पाऊस झाला. शिवाय, तब्बल १५ दिवसांच्या प्रतिक्षेनंतर गडचिरोलीत चांगला पाऊस झाला. १० दिवसांच्या प्रतीक्षेनंतर चंद्रपुरात पाऊस पडला आहे. याआधी २० जून रोजी पाऊस पडला होता. या पावसामुळं उष्णतेपासून दिलासा मिळाला आहे.

- Advertisement -

अचानक बरसलेल्या पावसाने शहरातील वाहतूक काही काळासाठी ठप्प झाली होती. समाधानकारक पाऊस नसल्यानं जिल्ह्यातील पेरण्या आहेत खोळंबल्या आहेत. केवळ ५ टक्केच पाऊस झाल्यानं बळीराजाला पेरणीसाठी दमदार पावसाची गरज आहे.


हेही वाचा – राज्यपालांनी बोलावलेलं विधानसभेचे विशेष अधिवेशन स्थगित

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -