घरमहाराष्ट्रफडणवीसांच्या कानात जे सांगितलं तस झालं असत तर ही वेळ…; आदित्य ठाकरे...

फडणवीसांच्या कानात जे सांगितलं तस झालं असत तर ही वेळ…; आदित्य ठाकरे स्पष्टचं बोलले

Subscribe

आज जे चालले आहे ते पाहुन खरंच तरूणांना राजकारणात यावे असे वाटेल का? असा सवालही आदित्य ठाकरेंनी उपस्थित केला

विधानसभेच्या अध्यक्षपदी आज भाजपच्या राहुल नार्वेकर यांनी नियुक्त झाली आहे. या निवडणुकीच्या माध्यमातून शिंदे- फडणवीस सरकारने विधीमंडळातील पहिली लढाई जिंकली आहे. राहुल नार्वेकर यांनी १६४ मतांनी शिवसेना उमेदवाराविरोधात विजय मिळवला. यामुळे राहुल नार्वेकर आता विधानसभेचे अध्यक्षपद सांभाळणार आहे. यावेळी राहुल नार्वेकर यांच्या अभिनंदन प्रस्तावावेळी शिवसेना आमदार आदित्य ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टोला लगावला आहे.

सुधीर मुनगंटीवार यांनी अजित पवारांना कानात सांगायला पाहिजे होते असं सांगितलं. आम्ही देवेंद्र फडणवीस यांच्या कानात सांगितलं होतं, तसं जर झालं असतं तर ही परिस्थिती अडीच वर्षांपूर्वीच दिसली असती आणि आज पलटी सुद्धा झाली असती, असा टोला आदित्य ठाकरेंनी लगावला आहे.

- Advertisement -

आजचे उपमुख्यमंत्री इतके हुशार आहेत की त्यांनी राहुल नार्वेकरांना वर बसवले आहे, कारण त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेससोबत जवळीक नको अशी कुरुबुर होती. म्हणून ज्यांची राष्ट्रवादी काँग्रेससोबत जवळीक आहे त्यांनाच वर बसवले आहे, असही आदित्य ठाकरे म्हणाले.

बंडखोर आमदारांनी व्हीप मोडला आहे आणि उपाध्यक्षांकडे याचा विरोध केला आहे. एकाही पाळलेल्या आमदाराने डोळ्यात डोळे घालून पाहण्याची हिंमत केली नाही. सगळे चोरून खाली किंवा दुसकीकडे बघत होते, आज त्यांनी आमच्याकडे पाहिले नाही पण मतदारांकडे गेल्यानंतर काय सांगणार? असा सवाल आदित्य ठाकरेंनी केला.

- Advertisement -

ठीक आहे आज त्यांनी बहुमताचा आकडा दाखवला आहे. आमचंही ठरलेलं आहे. आमचा व्हीप आहे तोच राहणार आहे’ अशा शब्दात शिवसेनेची बंडखोर आमदरांविरोधातील भूमिका ठाम असल्याचे आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केले.

विधानसभा अध्यक्षपदी आज तरुण अध्यक्ष मिळाला आहे. राजकारणाची पातळी घसरत चालली आहे. खरंच तरुणांना यात पडावं वाटेल का? आज राजकारण खुप वाईट स्थितीचा पोहचले आहे. आज जे चालले आहे ते पाहुन खरंच तरूणांना राजकारणात यावे असे वाटेल का? असे सवालही आदित्य ठाकरेंनी उपस्थित केले.


नार्वेकर विधानसभा अध्यक्षाच्या खुर्चीवर किती दिवस बसणार? सुनील प्रभूंचा सवाल


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -