घरमहाराष्ट्रनाशिकशिवसेना : डॅमेज कंट्रोलसाठी संजय राऊत नाशिक दौर्‍यावर

शिवसेना : डॅमेज कंट्रोलसाठी संजय राऊत नाशिक दौर्‍यावर

Subscribe

नाशिक : शिवसेनेतील बंडाळी उफाळून आल्यानंतर डॅमेज कंट्रोल करण्यासाठी उत्तर महाराष्ट्राचे संपर्क प्रमुख संजय राऊत हे शुक्रवार (दि.7) पासून दोन दिवस नाशिक जिल्हा दौर्‍यावर येत आहेत. या दौर्‍यात ते शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांना काय संदेश देतात याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून आहे.

महाविकास आघाडी सरकारविरोधात बंड करत एकनाथ शिंदे यांनी आमदारांना सोबत घेवून भाजपसोबत सत्ता स्थापन केली. स्वत: शिंदे मुख्यमंत्री झाल्यामुळे शिवसेनेतील नाराजांची संख्या भविष्यात वाढू नये, यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्षबांधणी सुरू केली आहे. याच पार्श्वभूमीवर खासदार संजय राऊत हे नाशिक जिल्हा दौर्‍यावर येत आहेत. मालेगावचे आमदार दादा भुसे व नांदगावचे आमदार सुहास कांदे हे संजय राऊत यांचे अत्यंत निकटवर्तिय मानले जात होते. परंतु, त्यांनीही बंडात सहभाग घेतल्यामुळे संजय राऊत यांनाही हा धक्का बसला आहे.

- Advertisement -

बंडखोरांना पर्यायी उमेदवार शोधण्याचे आदेश पक्षप्रमुख ठाकरे यांनी दिले आहेत. तर, शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम तयार झाला आहे. हा संभ्रम दूर करण्यासाठी राऊत यांचा जिल्हा दौरा अत्यंत महत्वाचा मानला जात आहे. पालिका व जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसैनिकांचे मनोबल वाढवण्याच्यादृष्टीने राऊत यांनी हा दौरा आयोजित केल्याचे समजते.

स्थानिक पदाधिकार्‍यांची बैठक

संजय राऊत नाशिक जिल्हा दौर्‍यावर येण्यापूर्वी शहरासह जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकार्‍यांनी बुधवार (दि.6) रोजी बैठक घेण्यात आली. या बैठकीला जिल्हाप्रमुख विजय करंजकर, उपनेते सुनील बागूल, माजी मंत्री बबन घोलप यांच्यासह जिल्हाप्रमुख सुनील पाटील व स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते. यापुढे शिवसेना कशी सांभाळायची आणि इच्छुकांना उमेदवारी मिळवून देताना काय काळजी घ्यायची, याबाबत यावेळी चर्चा झाली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -