घरताज्या घडामोडीराष्ट्रपती निवडणुकीत भाजप उमेदवाराला पाठींबा देण्याची राजेंद्र गावितांची मागणी

राष्ट्रपती निवडणुकीत भाजप उमेदवाराला पाठींबा देण्याची राजेंद्र गावितांची मागणी

Subscribe

मुंबईतील खासदार राहुल शेवाळे यांच्या पाठोपाठ आता पालघरचे शिवसेना खासदार राजेंद्र गावित यांनी राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत भाजपच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठींबा देण्याची मागणी केली आहे.

मुंबईतील खासदार राहुल शेवाळे यांच्या पाठोपाठ आता पालघरचे शिवसेना खासदार राजेंद्र गावित यांनी राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत भाजपच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठींबा देण्याची मागणी केली आहे. तसे पत्र गावित यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दिले आहे. त्यामुळे राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत भूमिका घेण्याबाबत शिवसेनेवर दबाव वाढला आहे. (Rajendra Gavit demand to support BJP candidate in the presidential election)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेना आणि भाजपमध्ये कमालीची कटुता निर्माण झाली आहे. भाजपला शिवसेना संपवायची आहे, असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला आहे. असे असताना शिवसेना खासदारांकडून राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत भाजप उमेदवाराला पाठींबा देण्याची मागणी होत आहे. राष्ट्रपतिपदासाठी येत्या १८ जुलैला निवडणूक होत असून शिवसेनेने या निवडणुकीत आपले कुणाला समर्थन असेल हे अजून स्पष्ट केलेले नाही.

- Advertisement -

द्रौपदी मुर्मू या आदिवासी समाजातील महिला आहे. त्यांच्या निमित्ताने आदिवासी समाजाला देशाच्या सर्वोच्च पदावर जाण्याचा बहुमान मिळणार आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी यापूर्वी महाराष्ट्राच्या कन्या प्रतिभाताई पाटील, कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते दिवंगत प्रणव मुखर्जी यांना पाठींबा दिला होता, या कडे लक्ष वेधत गावित यांनी मुर्मू यांना पाठींबा देण्याची विनंती ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात केली आहे.

दरम्यान, याआधी आदिवासी समाजातील सक्षम आणि कतृत्त्ववान महिला म्हणून शिवसेनेने भाजपाप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा द्यावा, अशी लेखी मागणी खासदार राहुल शेवाळे यांनी पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्याकडे केली आहे. याविषयीचे पत्र खासदार शेवाळे यांनी उद्धव ठाकरे यांची शिवसेना भवनात भेट घेऊन त्यांना सादर केले.

- Advertisement -

हेही वाचा – गोदावरी खोऱ्यातील वाया जाणारे पाणी सिंचनासाठी वळवण्याबाबत प्रयत्न करा, मुख्यमंत्री शिंदेंच्या सूचना

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -