घरताज्या घडामोडीप्रसाद लाड यांच्या घरासमोर सापडली चांदीच्या मूर्ती, सोनं आणि पैशाने भरलेली बॅग;...

प्रसाद लाड यांच्या घरासमोर सापडली चांदीच्या मूर्ती, सोनं आणि पैशाने भरलेली बॅग; पोलिसांकडून तपास सुरू

Subscribe

भाजपाचे विधान परिषदेचे आमदार प्रसाद यांच्या घरासमोर चांदीच्या मूर्ती, सोनं आणि पैशाने भरलेली बॅग सापडल्याची माहिती समोर येत आहे. प्रसाद लाड यांच्या घराबाहेर असलेल्या सुरक्षारक्षकांनी लाड यांना यासंदर्भात माहिती दिली.

भाजपाचे विधान परिषदेचे आमदार प्रसाद लाड यांच्या घरासमोर चांदीच्या मूर्ती, सोनं आणि पैशाने भरलेली बॅग सापडल्यानं एकच खळबळ उडाली आहे. प्रसाद लाड यांच्या घराबाहेर असलेल्या सुरक्षारक्षकांनी लाड यांना यासंदर्भात माहिती दिली. मात्र, ही बॅग प्रसाद लाड यांच्या घरासमोर कोणी ठेवली आणि कधी ठेवली याची माहिती अद्याप अस्पष्ट आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. परंतु चांदीच्या मूर्ती, सोनं आणि पैशाने भरलेली बॅग आमदारांच्या घरासमोर ठेवल्याने संशय व्यक्त केला जात आहे. (money bag gold money silver idol bag found in front of bjp mla prasad lad house)

टीव्ही 9 मराठी या वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, माटुंगा परिसरात भाजप (BJP) आमदार प्रसाद लाड यांचे घर आहे. ही बॅग रविवारी पहाटेच्या सुमारास सापडली. सुरुवातीला पहाटे घरासमोर अचानक बॅग दिसल्याने भीतीचे वातावरण होते. त्यानंतर या बॅगेबाबत सुरक्षारक्षकांनी प्रसाद लाड यांनी माहिती दिली. त्यानंतर याबाबत पोलिसांनाही माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन अधिक तपासाला सुरुवात केली. सध्या पोलिसांकडून प्रसाद लाड यांच्या घरासमोरील सीसीटीव्हीची तपासणी केली जात आहे.

- Advertisement -

दरम्यान, राज्यात सुरू असलेली राजकीय उलथापालथ संपुष्टात आल्यानंतर प्रसाद लाड यांना धमकीचा फोन आला होता. त्यावेळी प्रसाद लाड यांनी आपल्याला धमकीचे फोन आले असल्याची तक्रार मुंबईच्या गुन्हे शाखेकडे केली होती. सतत दोन दिवसापासून फोन येत असल्याने लाड यांनी गुन्हे शाखेच्या सहपोलीस आयुक्तांना पत्र लिहिले होते. “सध्याच्या राजकीय परिस्थितीमध्ये माझ्या जिवाला धोका असल्याची भीती व्यक्त केली होती. या चौकशीसाठी सीडीआर काढण्यास माझी हरकत नाही”, असे लाड यांनी पत्रात म्हटले होते. तसेच या धमकी प्रकरणाची चौकशी करून कारवाई करावी, अशीही मागणी लाड यांनी केली होती.


हेही वाचा – रेल्वेच्या ‘या’ स्थानकांची होणार सुधारणा; पावसाळ्यानंतर कामकाजाला सुरुवात

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -