घरमुंबईपावसाच्या दमदार हजेरीमुळे तानसा आणि तुळशी तलावाच्या पाणीपातळीत वाढ, मुंबईकरांच्या पाणीकपातीचे...

पावसाच्या दमदार हजेरीमुळे तानसा आणि तुळशी तलावाच्या पाणीपातळीत वाढ, मुंबईकरांच्या पाणीकपातीचे टेन्शन दूर

Subscribe

सध्या सात तलावांत मिळून एकूण ९,५२,५५० दशलक्ष लिटर (६५.८१ टक्के) इतका पाणीसाठा जमा झालेला आहे. हा पाणीसाठा पुढील ८ महिने म्हणजेच २४७ पुरेल इतका आहे. पुढील १७ मार्चपर्यंत तरी मुंबईकरांना पाणी कपातीचे टेन्शन असणार नाही.

मुंबई,  मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांपैकी मोडक सागर तलाव गुरुवारपासून भरून वाहू लागला. त्यापाठोपाठ आता तानसा व तुळशी हे दोन्ही तलाव भरण्याच्या मार्गावर आहेत. मुसळधार पावसाची बरसात सुरू राहिल्यास हे दोन्ही तलाव कोणत्याही क्षणी ‘ओव्हरफ्लो’ होण्याची शक्यता सूत्रांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
सध्या सात तलावांत मिळून एकूण ९,५२,५५० दशलक्ष लिटर (६५.८१ टक्के) इतका पाणीसाठा जमा झालेला आहे. हा पाणीसाठा पुढील ८ महिने म्हणजेच २४७ पुरेल इतका आहे. पुढील १७ मार्चपर्यंत तरी मुंबईकरांना पाणी कपातीचे टेन्शन असणार नाही.

हे ही वाचा – आता दोन युजर्सना एकत्रित करता येणार एकच ट्विट; Twitter चं नवं Co-Tweets…

- Advertisement -

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांत गेल्या काही दिवसांपासून चांगला पाऊस पडत आहे. त्यामुळे सर्वच तलावातील पाणीसाठ्याच्या पातळीत वाढ होत आहे. गुरुवारी या सात तलावांपैकी एक मोडक सागर तलाव भरून वाहू लागला होता. तर आता तुळशी व तानसा तलावही भरण्याच्या मार्गावर आहे. तुळशी तलावातील पाणी साठवण क्षमता ही ८,०४६ दशलक्ष लिटर इतकी आहे मात्र सध्या या तलावांत ७,३५१ दशलक्ष लिटर (९१.३७ टक्के) इतका पाणीसाठा आहे.
तर तानसा तलावाची पाणी साठवण क्षमता १,४५,०८० दशलक्ष लिटर इतकी असून सध्या तलावांत १,२५,९९८ दशलक्ष लिटर ( ८६.८५ टक्के) इतका पाणीसाठा आहे. तलाव क्षेत्रात मुसळधार पाऊस सतत पडत राहिल्यास कदाचित रात्रभरात कोणत्याही क्षणी तुळशी व तानसा तलाव एकामागोमाग एक भरून वाहू लागतील.

हे ही वाचा – Twitter Down : ट्वीटरची सेवा ठप्प, सोशल मीडियावर युजर्सच्या तक्रारींचा पाऊस

- Advertisement -

तलावांत पुढील २३ मार्चपर्यन्त पुरेल इतका पाणीसाठा
– – — – – – — — — – – ————————
सध्या पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांत एकूण ९,५२,५५० दशलक्ष लिटर (६५.८१ टक्के) इतका पाणीसाठा जमा झाला आहे. हा पाणीसाठा पुढील ८ महिने म्हणजेच २४७ दिवस म्हणजेच पुढील १७ मार्च २०२३ पर्यंत पुरेल इतका आहे. सात तलावांपैकी मोडक सागर गुरुवारपासूनच भरून वाहू लागला आहे. तर तानसा व तुळशी तलाव कोणत्याही क्षणी भरून वाहू लागणार आहे. तर उर्वरित तलावांपैकी मध्य वैतरणा तलावात १,२५,२९६ दशलक्ष लिटर (६४.७४ टक्के)इतका पाणीसाठा आहे. तर भातसा तलावांत ४,२५,९१४ दशलक्ष लिटर (५९.४० टक्के) इतका पाणीसाठा, विहार तलावांत १६,४९७ दशलक्ष लिटर (५९.५६ टक्के) पाणीसाठा जमा आहे. तसेच, अप्पर वैतरणा तलावांत १,२२,५६९ दशलक्ष लिटर ५३.९८ टक्के) इतका पाणीसाठा जमा झालेला आहे. त्यामुळे उर्वरित चार तलावांत ५० टक्केपेक्षाही जास्त पाणीसाठा जमा झालेला असल्याचे समोर येते.

हे ही वाचा – गुगलवरून बँक हेल्पलाईन नंबर घेणे पडले महागात, हिमाचलमधल्या माजी सैनिकाला २० लाखांचा…

सात तलावातील पाणीसाठा व टक्केवारी -:

तलाव पाणीसाठा टक्केवारी
दशलक्ष लिटर

————- ———— —————————-
उच्च वैतरणा १,२२,५६९ ५३.९८

मोडकसागर १,२८,९२५ १००.००

तानसा १,२५,९९८ ८६.८५

मध्य वैतरणा १,२५,२९६ ६४.७४

भातसा ४,२५,९१४ ५९.४०

विहार १६,४९७ ५९.५६

तुळशी ७,३५१ ९१.३७
———————————————————-
एकूण ९,५२,५५० ६५.८१

हे ही वाचा –  कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक ठप्प, चिपळूणजवळ दरड कोसळली; प्रवाशांचा खोळंबा

nidhi pednekar
nidhi pednekarhttps://www.mymahanagar.com/author/nidhipednekar/
मागील ४ वर्षांपासून आकाशवाणीवर मुंबई येथे कंटेन्ट रायटर आणि अँकर म्हणून काम करण्याचा अनुभव, पॉलिटिकल पि.आर. मॅनेजमेंट क्षेत्रात काम करण्याचा अनुभव त्याचसोबत ललित, मनोरंजन, राजकीय घडामोडी, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -