घरट्रेंडिंगउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरेंची भेट, मंत्रिमंडळात मनसेला जागा मिळणार?

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरेंची भेट, मंत्रिमंडळात मनसेला जागा मिळणार?

Subscribe

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची भेट घेतली. राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापनेनंतर प्रथमच देवेंद्र फडणवीस यांनी शिवतीर्थ या निवासस्थानी राज ठाकरेंची भेट घेतली.

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची भेट घेतली. राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापनेनंतर प्रथमच देवेंद्र फडणवीस यांनी शिवतीर्थ या निवासस्थानी राज ठाकरेंची भेट घेतली. शिवसेना-भाजपा युतीचे सरकर स्थापनेनंतर राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांचे पत्राद्वारे कौतुक केले होते. याच पत्राला उत्तर देण्यासाठी देवेद्र फडणवीस यांनी आज राज ठाकरेंची भेट घेतली. (deputy cm devendra fadnavis to meet mns chief raj thackeray)

काही दिवसांपूर्वी नागपुरमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत देवेद्र फडणवीस यांनी राज ठाकरेंच्या पत्राचे कौतुक केले होते. तसेच, त्यावेळी मला राज ठाकरेंसारखे पत्राद्वारे त्यांना धन्यवाद बोलता नाही आले, त्यामुळे मी त्यांची प्रत्यक्ष जाऊन भेट घेणार असल्याचे बोलले होते. त्यानुसार, फडणवीसांनी राज ठाकरेंची भेट घेतली. जवळपास दीड तास या भेटीत चर्चा झाली. फडणवीस-ठाकरे भेटीमुळं राज्यात राजकीय चर्चांना उधाण आले आहे. अमित ठाकरे यांना मंत्रिमंडळात संधी मिळणार असल्याची चर्चा रंगली होती.

- Advertisement -

या भेटीदरम्यान प्रसारमाध्यमांनी राज ठाकरे यांना अमित ठाकरे यांच्या मंत्रिपदाबाबत सवाल विचारला. त्यावेळी राज ठाकरे यांनी “कालची बातमी खोटी”, असे सांगत या वृत्ताचे खंडन केले. शिवसेनेला शह देण्यासाठी आता फडणवीस राज ठाकरे यांच्यासोबत युती करण्याच्या चर्चेलाही पूर्णविराम दिला. राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीवेळी राज यांच्या पत्नी शर्मीला ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांचे औक्षण केले.

दरम्यान, राज ठाकरे यांच्यावर नुकतीच एक शस्त्रक्रिया झाल्यामुळे त्यांनी पत्राद्वारे नवीन सरकारला शुभेच्छा दिल्या होत्या. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी या शुभेच्छांचा स्वीकार करत आम्ही एकदा थेट भेटायला जाणार आहोत, असे म्हटले होते. त्यामुळे या भेटीत राज ठाकरेंच्या तब्येतीची विचारपूस करण्याचा उद्देश होता, असे सांगण्यात येत आहे.

- Advertisement -

हेही वाचा – वाट बघण्यालाही मर्यादा असतात, शिंदे गटाचा ठाकरेंना अप्रत्यक्ष अल्टिमेटम

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -