घरमुंबईमराठा समाजातील अनेक नेत्यांनी महाराष्ट्राची बेअब्रू केली, संजय राऊत यांचा घणाघात

मराठा समाजातील अनेक नेत्यांनी महाराष्ट्राची बेअब्रू केली, संजय राऊत यांचा घणाघात

Subscribe

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार गेल्यनंतर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात नवे सरकार स्थापन झाले. मात्र, अद्याप मंत्रीमंडळ विस्तार करण्यात आलेला नाही. त्यात महाविकास आघाडीकडून शिंदे सरकारवर सातत्याने टीका केली जात आहे. शिवसेना खासदारा संजय राऊत यांनी रोखठोक सदरातून राज्य सरकारवर टीका केली.

दिल्ली दरबारात मराठेच शिष्टमंडळे घेऊन जात आहेत –

- Advertisement -

संजय राऊत यांनी शिवाजी महाराजांच्या काळातील उदाहरणे देत आजही तसेच राजकारण सुरू असल्याचा आरोप केला. दुही व विश्वासघात यांचे राजकारण शिवाजी महाराजांच्या काळातही चालले. आजही चालले आहे. चंदराव मोरे व गणोजी शिर्क्यांचेच राजकारण अजून चालू आहे. दिल्ल्लीच्या ज्या बादशहाच्या दरबारात मान वाकवायची नाही, या केवळ एका अभिमानाच्या मुद्द्यावर शिवछत्रपतींनी भर मोगल दरबारात प्राणांची पर्वा न करता मराठ्यांच्या अस्मितेचा भव्योदात्त आविष्कार प्रकट केला, त्या दिल्लीच्या आजच्या दरबारात ‘‘आमचा महाराष्ट्रच नष्ट करा हो!’’ म्हणून मराठेच शिष्टमंडळे घेऊन जात आहेत, असा आरोप संजय राऊत यांनी केला.

राज्य दिल्लीपुढे झुकणाऱ्या बाजारबुणग्यांच्याच हाती –

- Advertisement -

पुढे विश्वासघाताचे व दुहीचे राजकारण महाराष्ट्रात सुरू आहे. शिवछत्रपतींनंतर त्यांचा अभिमान बोलला तो फक्त लोकमान्य टिळकांच्या व बाळासाहेब ठाकरे यांच्या मुखातून. त्यानंतर महाराष्ट्राला तसा नेता लाभला नाही. आता तर राज्य दिल्लीपुढे झुकणाऱ्या बाजारबुणग्यांच्याच हाती गेले. हा बट्टय़ाबोळच आहे”, अशा शब्दांत संजय राऊत यांनी  राज्य सरकारवर टीका केली.

महाराष्ट्राची बेअब्रू –

व्यक्तिगत स्वार्थ, सत्तेची अभिलाषा यांनी झपाटलेले मूठभर लोक सत्तेशिवाय जणू काही देशसेवाच नाही अशा तिरमिरीने एका गटाकडे धावत सुटली आहेत. याचा सर्वात जास्त आनंद भाजपला व सध्याच्या दिल्ली दरबारास होत असेल. मोगलांना सर्व मराठे सामील होण्याचाच हा प्रकार आहे. शिवाजीराजे ‘मराठा’ होते म्हणून जादा अभिमान बाळगणाऱ्या मराठा समाजातील अनेक नेत्यांनी (लोकांनी नव्हे!) महाराष्ट्राची बेअब्रू केली आहे, असा आरोप संजय राऊत यांनी सामनातून केला आहे.

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -