घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रगद्दारी नाही, तर उठाव केलाय; आमदार कांदे यांची स्पष्टोक्ती

गद्दारी नाही, तर उठाव केलाय; आमदार कांदे यांची स्पष्टोक्ती

Subscribe

मनमाड : आम्ही कोणतीही गद्दारी केली नाही, कधीही शिवसेना सोडली नाही आणि सोडणारही नाही. आजही मातोश्री माझ्यासाठी पंढरी आहे, तर हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब माझ्यासाठी देव आहेत. पक्षप्रमुख उद्धव साहेब यांना आम्ही माऊलीच म्हणतो, तर आदित्यसाहेब ठाकरे यांच्याबद्दल आजही कमालीचा आदर आहे. आम्ही आपला आजही आदर करतो पण आपण आम्हाला गद्दार म्हणू नका, आम्ही गद्दारी केली नाही. आम्ही उठाव केला असल्याचे प्रतिपादन आमदार सुहास कांदे यांनी केले.

येथील सगळे लॉन्समध्ये आयोजित कार्यकर्त्याच्या मेळाव्यात ते बोलत होते. मंचावर माजी सभापती विलास आहेर, राजभाऊ देशमुख, राजेंद्र भाबड, बाळासाहेब आव्हाड, किशोर लहाने, अंकुश कातकडे, अंजुमताई कांदे, माजी नगरसेविका संगीता बागूल, विद्या जगताप, भाजप शहराध्यक्ष जय फुलवाणी, आरपीआयचे माजी नगराध्यक्ष राजेंद्र आहिरे, माजी नगरसेवक गंगाभाऊ त्रिभुवन उपस्थित होते. माजी नगराध्यक्ष साईनाथ गिडगे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित या मेळाव्यास मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. सगळे लॉन्स हा शहरातील मोठ्या लॉन्सपैकी एक असताना पूर्ण क्षमतेने भरून बाहेरही कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

काय म्हणाले आ. कांदे

  • आघाडी सरकार पाडण्यासाठी शिंदे साहेबांसोबत मीदेखील होतो
  • मतदारसंघातील जनतेचा आजही भरभरून आशीर्वाद
  • मुंबई बॉम्बस्फोट घडवणारेच लोक मंत्रीपदावर होते
  • शिवसेना हिंदूत्वापासून दूर चालली होती, म्हणूनच निर्णय
  • मतदारसंघाच्या विकासासाठी सत्तेत असूनही संघर्ष होता
  • उद्धव साहेब, आदित्य साहेबांच्या अनेकदा लक्षात आणूनही दिले
  • सातत्याने दुर्लक्ष झाल्याने पन्नास आमदारांनी मिळून केला उठाव
  • आता शिंदे साहेबांच्या नेतृत्वात मतदारसंघात आणणार विकासगंगा
  • शिंदे साहेबांमुळेच मिळाली करंजवण पाणीपुरवठा योजना
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -