घरताज्या घडामोडीभडकाऊ भाषण करून चितावणी देणाऱ्यांवर पोलीस कारवाई करणार, एकनाथ शिंदेंचा इशारा

भडकाऊ भाषण करून चितावणी देणाऱ्यांवर पोलीस कारवाई करणार, एकनाथ शिंदेंचा इशारा

Subscribe

शिवसैनिक आणि बंडखोर आमदार यांच्यातील संघर्ष आता शिगेला पोहोचला आहे. शिंदे गटाचे बंडखोर आमदार आणि माजी मंत्री उदय सामंत यांच्या गाडीवर शिवसैनिकांनी आक्रमक हल्ला केला आहे. यामध्ये उदय सामंतांची गाडी ही शिवसैनिकांकडून फोडण्यात आलेली आहे. शिवसेना नेते तानाजी सावंत यांच्या घराकडे जाताना हा प्रकार घडला आहे. दरम्यान या सर्व प्रकरणाबाबत उदय सामंत यांनी पुण्यातील कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. तसेच या हल्ल्याविरोधात तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. तसेच या प्रकरणावर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना इशारा दिला आहे.

काय म्हणाले एकनाथ शिंदे?

गाडीवर दगड मारून पळून जाणे ही मर्दुमकी नाहीये. कायदा व सुव्यवस्था करण्याचं पालन सरकार आणि पोलिसांचं आहे. त्यामुळे त्यांनी हे केलंय. पोलीय या प्रकरणावर योग्य ती कारवाई करतील. यासंदर्भात मी पोलिसांसोबत बोलणार आहे. कायदा व सुवस्था राखण्याचं काम सर्वांनी केलं पाहिजे. अशा प्रकारचं भडकाऊ भाषण करून चितावणीखोर करण्याचं काम जर कोणी करत असेल तर पोलीस कायदेशीर कारवाई करतील, असं म्हणत एकनाथ शिंदेंनी विरोधकांना इशारा दिला आहे.

- Advertisement -

माझ्या गाडीवरील हल्ला पूर्वनियोजित – उदय सामंत

माझ्या गाडीवरील हल्ला हा पूर्वनियोजित होता. या हल्ल्यात मला काही झाले असते, तर मी माझ्या आई-वडिलांना काय उत्तर दिले असते. सिग्नलला गाडी थांबलेली असता माझ्या गाडीवर हल्ला करण्यात आला. दोन पांढरे शर्ट घातलेले अज्ञात व्यक्ती गाडीतून उतरले. त्या दोघांच्या हातात हत्यारे होते. एकाच्या हातात बेस बॉलची स्टीक होती. तर दुसऱ्याच्या हाताला दगड बांधला होता. त्यामुळे सुपारी देऊन हा हल्ला करण्यात आल्याचा आरोप उदय सामंत यांनी केला आहे.

दरम्यान, कात्रज भागात आज आदित्य ठाकरे यांची सभा होती. याच भागातून उदय सामंत हे मुंबईच्या दिशेने जात असताना ट्राफिक खोळबंली होती. यादरम्यान शिवसैनिकांनी उदय सामंत यांची गाडी अडवली. तसेच पोलिसांनी यावेळी सौम्य लाठीमार केला.

- Advertisement -

हेही वाचा : माझ्या गाडीवरील हल्ला पूर्वनियोजित; उदय सामंत यांचा गंभीर आरोप


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -