घरमुंबईपुढील सुनावणीपर्यंत 'आरे'तील एकही झाड तोडू नका, सर्वोच्च न्यायालयाचा आदेश

पुढील सुनावणीपर्यंत ‘आरे’तील एकही झाड तोडू नका, सर्वोच्च न्यायालयाचा आदेश

Subscribe

आरेतील एकही झाड कापू नये असे आदेश शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकार आणि मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनला दिले. न्यायालयातील पुढील सुनावणी १० ऑगस्ट रोजी होणार आहे. त्यामुळे शिंदे - फडणवीस सरकारला सर्वोच्च न्यायालयाचा दणका बसला आहे.

मेट्रो कारशेड(aarey carshed) आरे मध्ये होणार असा निर्णय शिंदे – फडणवीस सरकार यांनी घेतला होता. मेट्रो – ३ प्रकल्पासाठी कारशेडचं काम हे आरे मध्ये होणार असल्याने तिथे होणाऱ्या वृक्षतोडीविरोधात पर्यावरण प्रेमींनी सर्वोच्च न्यायालयात (supreme court) याचिका केली होती. मेट्रो ३ (कुलाबा-वांद्रे-सीप्झ) मार्गिकेतील आरे कारशेडच्या कामासाठी पुढील सुनावणी होईपर्यंत आरेतील एकही झाड कापू नये असे आदेश शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकार आणि मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनला दिले. न्यायालयातील पुढील सुनावणी १० ऑगस्ट रोजी होणार आहे. त्यामुळे शिंदे – फडणवीस सरकारला सर्वोच्च न्यायालयाचा दणका बसला आहे.

हे ही वाचा – Aarey carshed : आरे कारशेडच्या प्रतिबंधित क्षेत्रामध्ये कोणतेही काम नाही – रणजित सिंह देओल

- Advertisement -

आरेतील मेट्रो कारशेडच्या(aarey carshed) कामावर असलेली स्थगिती राज्य सरकारने उठवली त्यानंतर मेट्रो ३ च्या गाडीचे डबे आणण्यासाठी अडचड ठरत आलेल्या झाडांची छाटणी सुरु केली. पर्यावरण प्रेमींनी याविरोधात आवाज उठवत तीव्र विरोध दर्शवत सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. यावरच पुढील सुनावणी होईपर्यंत न्यायालयाने आरेतील वृक्षतोडीवर बंदी घातली आहे. न्यायमूर्ती उदय लळीत यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या खंडपीठासमोर शुक्रवारी सुनावणी झाली. त्यावेळी न्यायालयाने पुढील न्यायालयीन सुनावणी होईपर्यंत आरेतील एकही झाड तोडू नये असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.

- Advertisement -

हे ही वाचा –  #AareyForest : २९ आंदोलनकर्त्यांना अटक, कोर्टाने सुनावली न्यायालयीन कोठडी

उदय लळीत यांच्या अध्यक्षतेखालीकी न्यायालयीन सुनावणी

आरे मेट्रो कारशेड संदर्भात सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी झाली. झालेल्या सुनावणीनुसार सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांनी गुरुवारी केंद्र सरकारला पत्रव्यवहार करून भावी सरन्यायाधीश म्हणून ज्येष्ठता क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या न्यायमूर्ती उदय लळित(uday lalit) यांच्या नावाची शिफारस केली आहे. त्यामुळे न्यायमूर्ती लळित यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर सुनावणी आज पार पडली. दरम्यान या प्रकरणातील पुढील सुनावणी १० ऑगस्ट रोजी होणार आहे. त्यामुळे शिंद – फडणवीस सरकारला न्यायालयीन दणका बसला आहे.

हे ही वाचा – आरे वृक्षतोडीविरोधातील याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणीची शक्यता

nidhi pednekar
nidhi pednekarhttps://www.mymahanagar.com/author/nidhipednekar/
मागील ४ वर्षांपासून आकाशवाणीवर मुंबई येथे कंटेन्ट रायटर आणि अँकर म्हणून काम करण्याचा अनुभव, पॉलिटिकल पि.आर. मॅनेजमेंट क्षेत्रात काम करण्याचा अनुभव त्याचसोबत ललित, मनोरंजन, राजकीय घडामोडी, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -