घरक्रीडाकॉमनवेल्थमध्ये भारतीय महिला हॉकी टीमवर सेमीफायनलमध्ये अन्याय, सेहवागही संतापला

कॉमनवेल्थमध्ये भारतीय महिला हॉकी टीमवर सेमीफायनलमध्ये अन्याय, सेहवागही संतापला

Subscribe

इंग्लडमधील बर्मिंघममध्ये सुरू असलेल्या २२ व्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारतीय महिला हॉकी टीमबरोबर सेमीफायनलमध्ये अन्याय झाला आहे.

इंग्लडमधील बर्मिंघममध्ये सुरू असलेल्या २२ व्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारतीय महिला हॉकी टीमने शानदार खेळी करत सेमीफायनल गाठले. पण सेमीफायनलमध्ये या महिला खेळाडूंवर अन्याय झाल्याने शानदार खेळूनही त्यांना पराभूत व्हावे लागले. यावरून आता देशभरात संतापाची लाट उसळली असून भारतीय क्रिकेट टीमचा माजी खेळाडू वीरेंद्र सहवाग यानेही यावर नाराजी व्यक्त केली आहे.

- Advertisement -

भारत आणि ऑस्ट्रेलियातली ही हॉकी मॅच ड्रॉ झाली. त्यानंतर पेनल्टी शूटआऊटमध्ये भारतीय टीमची चक्क फसवणूक करण्यात आल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे टीमचे मनोबल ढासळले असा आरोप करण्यात येत आहे. कॉमनवेल्थ गेम्समध्ये शुक्रवारी भारतीय महिला हॉकी टीम आणि ऑस्ट्रेलियन टीम यांच्यात सेमीफायनलचा सामना होता. सामन्याच्या सुरुवातीला तीन क्वार्टरपर्यंत ऑस्ट्रेलियन टीमचे वर्चस्व होते. पण चौथ्या क्वार्टरमध्ये मात्र भारतीय टीमने शानदार खेळी करत गोल केला . यामुळे सामना बरोबरीत झाला. वंदना कटारिया हीने सामन्याच्या ४९व्या मिनिटात हा गोल केला होता. त्यानंतर मॅच ड्रॉ झाली. नंतर पेनल्टी शूटआऊटमध्ये ॉ्सट्रेलियाच्या आधी भारताची कर्णधार आणि गोलकिपर सविता पुनिया हीने चपळाईने गोल वाचवला होता. मात्र रेफरीने टायमरच चालून नसल्याचे सांगितले. यामुळेच ऑस्ट्रेलियाला हीच पेनल्टी दुसऱ्यांदा घ्यावी लागली. जाणकारांच्यामते यात भारतीय खेळाडूंची काहीच चूक नवह्ती. पण तरीही रेफरीच्या चुकांचा फटका भारतीय टीमला बसला. कारण दुसऱ्यांदा पॅनल्टी मिळाल्यानंतर ऑस्ट्रेलियाने कुठलीही चूक न करता गोल केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -