घरक्रीडाऑस्ट्रेलियाच्या विश्वविजेत्या महिला कर्णधाराचा क्रिकेटपासून काही काळासाठी दूर राहण्याचा मोठा निर्णय

ऑस्ट्रेलियाच्या विश्वविजेत्या महिला कर्णधाराचा क्रिकेटपासून काही काळासाठी दूर राहण्याचा मोठा निर्णय

Subscribe

कॉमनवेल्थ स्पर्धेत आपल्या संघाला सुवर्णपदक मिळवून देणारी ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघाची कर्णधार मेग लॅनिंगने क्रिकेटपासून काही काळासाठी दूर राहण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने ट्विटरद्वारे याबद्दल अधिकृत माहिती दिली आहे. वैयक्तिक कारणामुळे तिने हा मोठा निर्णय घेतला आहे. मेग लॅनिंग ही ऑस्ट्रेलियाची वनडे आणि टी-२० विश्वचषक विजेती कर्णधारही आहे.

या निर्णयाबद्दल मेग लॅनिंग म्हणाली की, काही व्यस्त वर्षानंतर शेवटी मी क्रिकेटमधून काही काळासाठी विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला आहे. जेणेकरून मला स्वत:ला वेळ देता येईल. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने माझ्या निर्णयाचा आदर केल्यामुळे मी त्यांची आभारी आहे.

- Advertisement -

ऑस्ट्रेलिया महिला संघाने नुकतेच तिच्या नेतृत्वाखाली कॉमनवेल्थ स्पर्धेत जेतेपद पटकावले आहे. या स्पर्धेतील साखळी फेरी सामन्यातील ३ पैकी ३ सामने जिंकत ऑस्ट्रेलिया संघाने उपांत्य फेरीत प्रवेश केला होता. उपांत्य फेरीत न्यूझीलंडवर ५ विकेट्सने विजय मिळवत ऑस्ट्रेलिया संघ अंतिम सामन्यात पोहोचला होता. लॅनिंगच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलिया महिला संघाने ३ टी-२० विश्वचषक आणि एक वनडे विश्वचषक जिंकला आहे.

- Advertisement -

कॉमनवेल्थ स्पर्धेच्या अंतिम सामन्यात लॅनिंग

भारताविरुद्ध खेळल्या गेलेल्या कॉमनवेल्थ स्पर्धेच्या अंतिम सामन्यात लॅनिंगने आपल्या संघासाठी २६ बॉल्समध्ये ३६ धावा काढल्या आहेत. या संघाच्या विजयात तिचे मोलाचे योगदान आहे. या खेळीत तिने ५ चौकारांसह शानदार षट्कार ठोकला आहे.


हेही वाचा : आशिया चषक 2022 : भारतासमोर पाकिस्तानच्या शाहीन आफ्रिदीचे आव्हान


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -