घरभक्तीरक्षाबंधन विशेष : भावाला राखी बांधण्यापूर्वी म्हणा 'हा' मंत्र, घ्या 'या' गोष्टींची...

रक्षाबंधन विशेष : भावाला राखी बांधण्यापूर्वी म्हणा ‘हा’ मंत्र, घ्या ‘या’ गोष्टींची काळजी

Subscribe

शुभ मुहूर्तावर रक्षाबंधनाचा सण साजरा करणं अत्यंत शुभ मानलं जातं. ज्योतिष शास्त्रानुसार, रक्षाबंधनाच्या दिवशी शुभ मुहूर्तासोबतच योग्य दिशा पाहणं देखील महत्वाचं आहे.

श्रावण महिन्याच्या पौर्णिमेला रक्षाबंधन हा सण साजरा केला जातो. या दिवशी बहिण आपल्या भावाच्या हातात राखी बांधून त्याच्या दिर्घआयुष्याची कामना करते. या बदल्यात भाऊ आपल्या बहिणीला तिचं आयुष्यभर रक्षन करेन असं वचन देतो, तसेच बहिणीची आवडती वस्तू भेट म्हणून देतो. यावर्षी ११ ऑगस्ट रोजी रक्षाबंधन साजरी केली जाईल. यावर्षी रक्षाबंधनाचा दिवस खूप खास असणार आहे.

शुभ मुहूर्तावर रक्षाबंधनाचा सण साजरा करणं अत्यंत शुभ मानलं जातं. ज्योतिष शास्त्रानुसार, रक्षाबंधनाच्या दिवशी शुभ मुहूर्तासोबतच योग्य दिशा पाहणं देखील महत्वाचं आहे. सोबतच राखी बांधताना भावाच्या कल्याणासाठी आणि दीर्घायुष्यासाठी काही मंत्र देखील म्हणायला हवे.

- Advertisement -

राखी बांधण्यापूर्वी घ्या या गोष्टींची काळजी
ज्योतिषार्यांच्या मते, राखी बांधताना भावाचे तोंड पूर्व किंवा उत्तर दिशेकडे असावे. तर भावाची पाठ पश्चिम किंवा दक्षिणेकडे असावी. राखी बांधण्यापूर्वी भावाच्या डोक्यावर रूमाल किंवा टोपी जरूर ठेवा.

राखी बांधताना करा या मंत्राचे पठण
येन बद्धो बलि: राजा दानवेंद्रो महाबल:।
तेन त्वामपि बध्नामि रक्षे मा चल मा चल।
ॐ व्रतेन दीक्षामाप्नोति, दीक्षयाऽऽप्नोति दक्षिणाम् ।
दक्षिणा श्रद्धामाप्नोति, श्रद्धया सत्यमाप्यते ॥

- Advertisement -

रक्षाबंधन शुभ मुहूर्त

  • अभिजीत मुहूर्त- त्यामुळे यावेळी राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त सकाळी ११ वाजून ३७ मिनिटांपासून ते रात्री १२ वाजून २९ मिनिटांपर्यंत असेल.
  • विजय मुहूर्त – दुपारी २ वाजून १४ मिनिटांपासून ते ३ वाजून ७ मिनिटांपर्यंत
  • राखी बांधण्याचा सर्वोत्तम मुहूर्त ११ ऑगस्ट, रात्री ८ वाजून ५२ मिनिटांपासून ते ९ वाजून १४ मिनिटांपर्यंत आहे.

हेही वाचा :रक्षाबंधन विशेष : भद्रा काळात रक्षाबंधनाच्या दिवशी चुकूनही बांधू नका राखी नाहीतर होईल पश्चाताप

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -