घरअर्थजगतस्वस्त सोने खरेदीची सुवर्णसंधी, सॉवरेन गोल्ड बॉन्ड योजनेचा दुसरा टप्पा जाहीर

स्वस्त सोने खरेदीची सुवर्णसंधी, सॉवरेन गोल्ड बॉन्ड योजनेचा दुसरा टप्पा जाहीर

Subscribe

स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, पोस्ट ऑफिस आणि मान्यताप्राप्त स्टॉक एक्सचेंज, एनएसई आणि बीएसई मार्फत तुम्ही हे बॉन्ड खरेदी करू शकता. मात्र, स्मॉल फायनान्स बँक आणि पेमेंट बँकेमार्फत तुम्ही हे गोल्ड बॉन्ड खरेदी करू शकत नाहीत.

भारतीयांना स्वस्तात सोने खरेदी करता यावी याकरता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सॉवरेन गोल्ड बॉन्ड योजनेचा दुसरा टप्पा जाहीर केला आहे. त्यानुसार २२ ऑगस्ट ते २६ ऑगस्टच्या काळात तुम्ही सॉवरेन गोल्ड बॉन्डमध्ये गुंतवणूक करू शकता. या योजनेचा पहिला टप्पा २० ते २३ जून दरम्यान जाहीर झाला होता. यावेळी अनेक गुंतवणूकदारांनी या गंतवणूक केली होती.

हेही वाचा – Sovereign Gold Bond : मोदी सरकारची आजपासून सोन्याच्या प्रति ग्रॅमसाठी मोठी सवलत

- Advertisement -

या योजनेतील दुसऱ्या टप्प्यातील गोल्ड बॉन्डच्या किंमती जाहीर झालेल्या नाहीत. मात्र, पहिल्या टप्प्यातील गोल्ड बॉन्डसाठी प्रति ग्रॅम ५०९१ रुपये इश्यूची किंमत होती. ऑनलाईन खरेदी केल्यावर ५० रुपये प्रति ग्रॅम सूट देण्यात आली होती.

निवासी व्यक्ती, हिंदू अविभक्त कुटुंब, ट्रस्ट, विद्यापीठे आणि धर्मादाय संस्था हे बॉन्ड विक घेऊ शकतात. तर, वैयक्तिक गुंतवणूकदार एका वर्षांत जास्तीत जास्त ४ किलो सोन्याचे रोखे खरेदी करू शकतात. तर, ट्रस्ट किंवा संस्था एका वर्षांत जास्तीत जास्त २० किलोचे रोखे खरेदी करू शकतात.

- Advertisement -

ऑनलाईन खरेदीवर प्रति ग्रॅम ५० रुपयांची सूट

गोल्ड बॉन्डसाठी तुम्ही डिजिटल माध्यमाचा वापर केल्यास ग्राहकांना प्रति ग्रॅममागे ५० रुपयांची सूट देण्यात येणार आहे. तर, गुंतवणूकदारांना सहामाही आधारावर निश्चित किंमतीवर वार्षिक 2.5 टक्के व्याज दिले जाईल. सार्वभौम गोल्ड बाँडचा कार्यकाळ आठ वर्षांचा असेल आणि पाचव्या वर्षानंतर ग्राहकांना त्यातून बाहेर पडण्याचा पर्याय असेल. या बाँड्सचा मॅच्युरिटी कालावधी 8 वर्षांचा आहे आणि लॉक-इन कालावधी 5 वर्षांचा आहे, त्यामुळे त्याची अकाली पूर्तता 5 वर्षांनी आणि पूर्ण विमोचन 8 वर्षानंतर होऊ शकते. तसेच, हे सर्व बॉंड भारतीय रिझर्व्ह बॅंकेद्वारे भारत सरकारकडून जारी केले जातील. त्यानंतर भारतीय सराफा आणि आभूषण संघ लिमिटेडद्वारे प्रकाशित असा ९९९ शुद्धतेचे सोने उपलब्ध होणार आहे.

स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, पोस्ट ऑफिस आणि मान्यताप्राप्त स्टॉक एक्सचेंज, एनएसई आणि बीएसई मार्फत तुम्ही हे बॉन्ड खरेदी करू शकता. मात्र, स्मॉल फायनान्स बँक आणि पेमेंट बँकेमार्फत तुम्ही हे गोल्ड बॉन्ड खरेदी करू शकत नाहीत.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -