घरताज्या घडामोडीMPSC, बीएड सीईटी परीक्षा एकाच दिवशी आल्याने सरकारचा विद्यार्थ्यांसमोर 'हा' पर्याय

MPSC, बीएड सीईटी परीक्षा एकाच दिवशी आल्याने सरकारचा विद्यार्थ्यांसमोर ‘हा’ पर्याय

Subscribe

महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा (MPSC Exam) आणि बीएड सीईटी परीक्षा (B.Ed CET Exam) एकाच दिवशी आली आहे. 21 ऑगस्ट रोजी एकाच तारखेला एमपीएससी (MPSC Exam) आणि बीएड सीईटी परीक्षा (B.Ed CET Exam) आल्याने विद्यार्थी नाराज झाले होते. दोन्ही परीक्षा एकत्र देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या समोर मोठी अडचण निर्माण झाली होती.

महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा (MPSC Exam) आणि बीएड सीईटी परीक्षा (B.Ed CET Exam) एकाच दिवशी आली आहे. 21 ऑगस्ट रोजी एकाच तारखेला एमपीएससी (MPSC Exam) आणि बीएड सीईटी परीक्षा (B.Ed CET Exam) आल्याने विद्यार्थी नाराज झाले होते. दोन्ही परीक्षा एकत्र देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या समोर मोठी अडचण निर्माण झाली होती. मात्र आता सरकारने यावर विद्यार्थ्यांसाठी तोडगा काढला आहे. दोन्ही परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना तारखेबाबत पर्याय देण्यात येणार असल्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेत सांगितले. (government gave solution on mpsc exam and bed cet exams same day)

महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा (एमपीएससी) आणि बीएड सीईटी परीक्षा एकाच दिवशी आल्याने विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. एमपीएससीची परीक्षा 21 ऑगस्ट आणि बीएड सीईटी परीक्षा 21 ऑगस्टपासून तीन दिवस होणार आहे. त्यामुळे दोघांपैकी एका परीक्षेला मुकावं लागणार की काय, अशी भावना आणि संभ्रम विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झाला होता.

- Advertisement -

उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी एमपीएससी (MPSC Exam) आणि बीएड सीईटी परीक्षा (B.Ed CET Exam) एकत्र देणाऱ्या विद्यार्थ्यांना तारखेबाबत पर्याय दिला जाईल. यासाठी परीक्षार्थींनी त्वरीत सीईटी सेलशी संपर्क साधावा. तेथे तुम्हाला दोन्ही परीक्षा देण्याचा पर्याय उपलब्ध करुन देण्यात येईल.


हेही वाचा – राष्ट्रपतींच्या अभिनंदनाच्या प्रस्तावावरून अजित पवारांचा नाव न घेता राज्यपाल भगत सिंह कोश्यारींना टोला

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -