घरमहाराष्ट्रखोके घेऊन ओके झालेल्या सरकारचा धिक्कार; अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल

खोके घेऊन ओके झालेल्या सरकारचा धिक्कार; अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल

Subscribe

पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी ईडी सरकार, राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा या अशा अनेक मुद्यांवरून विरोधी बाकावर बसलेल्या नेतेमंडळींनी सरकारवर हल्लाबोल केला आहे.

महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार कोसळून शिंदे – फडणवीस(shinde – fadanvis) सरकार स्थापन झाले. महिन्याभरापासून रखडलेला मंत्रिमंडळाचा विस्तार आखेर झाला आणि बहुचर्चित असलेल्या पावसाळी अधिवेशनाला सुद्धा आज पासून सुरुवात झाली. अधिवेशन म्हटलं की सत्ताधारी आणि विरोधी बाकावर बसलेली नेते मंडळी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत असतात. अशातच आज पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी ईडी सरकार, राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा या अशा अनेक मुद्यांवरून विरोधी बाकावर बसलेल्या नेतेमंडळींनी सरकारवर हल्लाबोल केला आहे. पावसाळी अधिवेशन हे 17 ऑगस्ट पासून 25 ऑगस्ट असणार आहे.

 

- Advertisement -

1)विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे
विधानभवनात आगमन झाले.

 

- Advertisement -

2) विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या सुरुवातीला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानभवनच्या प्रांगणातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

 

3)विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या प्रारंभी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेतली आणि त्यांना शुभेच्छा दिल्या.

 

4) विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांनी सरकारवर हल्ला बोल केला आहे. राज्यातील विविध समस्यांवरून विरोधकांनी सरकारवर निशाणा साधला.

 

5) खोके घेऊन ओके झालेल्या सरकारचा धिक्कार असो… स्थगिती सरकार हाय हाय… अशा घोषणा देत विरोधी पक्षनेत्यांनी सरकारवर घणाघात केला.

 

6) सरकारकडून राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा अशी मागणी करत विरोधकांनी विधानभवन परिसर दणाणून सोडला. आजपासून पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली असून विरोधी पक्षांच्यावतीने ईडी सरकारला धारेवर धरण्यात आले.

 

7) ईडी सरकार हाय हाय, या सरकारचं करायचं काय, खाली डोकं वर पाय, आले रे आले ५० खोके आले, खोके घेऊन ओके झालेल्या सरकारचा धिक्कार असो असं म्हणत विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या सह धंनजय मुंडे यांनी सुद्धा घोषणा देत सरकारवर टीका केली.

 

8) अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे व मविआच्या आमदारांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन करून बेकायदेशीर सरकारच्या मनमानी कारभाराविरोधात निषेध व्यक्त केला.

 

nidhi pednekar
nidhi pednekarhttps://www.mymahanagar.com/author/nidhipednekar/
मागील ४ वर्षांपासून आकाशवाणीवर मुंबई येथे कंटेन्ट रायटर आणि अँकर म्हणून काम करण्याचा अनुभव, पॉलिटिकल पि.आर. मॅनेजमेंट क्षेत्रात काम करण्याचा अनुभव त्याचसोबत ललित, मनोरंजन, राजकीय घडामोडी, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -