घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रस्वातंत्र्य सैनिकांचे योगदान विसरता कामा नये : भुजबळ

स्वातंत्र्य सैनिकांचे योगदान विसरता कामा नये : भुजबळ

Subscribe

राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने स्वातंत्र्य सैनिकांच्या वारसांचा सन्मान

नाशिक : भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत आहे. आपल्याला मिळालेलं हे स्वातंत्र्य अनेक वीरांच्या बलिदानातून मिळालेले असून या स्वातंत्र्य सैनिकांचे योगदान आपण विसरलो नाही आणि विसरता देखील कामा नये, असे प्रतिपादन राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केले.

राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने भुजबळ फार्म येथील कार्यालयात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त नाशिक शहरातील स्वातंत्र्य सैनिक व त्यांच्या कुटुंबियांच्या सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात होते. या स्वातंत्र्य सैनिक व कुटुंबियांचा सन्मान राज्याचे छगन भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी बोलताना ते म्हणाले की, देशाला स्वातंत्रय मिळविण्यासाठी अनेकांनी आपले बलिदान दिले, अनेकांनी तुरुंगवास भोगला त्यांनंतर आपल्या स्वातंत्र्य मिळाले आहे. नाशिकच्या अनेक स्वातंत्र्य सैनिकांनीदेखील महत्वपूर्ण असे योगदान दिले आहे. त्यामुळे ज्यानी ज्यांनी या स्वातंत्र्य लढ्यात आपले योगदान दिले त्या स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानाचा इतिहास विसरता कामा नये असे त्यांनी सांगितले. शहराध्यक्ष रंजन ठाकरे, प्रदेश पदाधिकारी दिलीप खैरे, युवक शहराध्यक्ष अंबादास खैरे, प्रदेश युवक कार्याध्यक्ष पुरुषोत्तम कडलग,ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक उत्तममामा तांबे, सरचिटणीस संजय खैरनार, विजय राऊत, संतोष जगताप, अमोल नाईक, अ‍ॅड.चिन्मय गाढे, जय कोतवाल, शादाब सैय्यद, सागर बेदरकर यांच्यासह स्वातंत्र्य सैनिक व कुटुंबातील सदस्य उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -