घरट्रेंडिंगअमेरिकेत 2000 मुलांनी केलं भगवत गीतेचं पठण; व्हायरल व्हिडीओ पाहून तुम्हालाही वाटेल...

अमेरिकेत 2000 मुलांनी केलं भगवत गीतेचं पठण; व्हायरल व्हिडीओ पाहून तुम्हालाही वाटेल आश्चर्य

Subscribe

सध्या हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत असून यामध्ये एका मोठ्या स्टेडियममध्ये हजारो लहान मुलं एकत्र भागवत गीतेचा पाठ करत आहेत.

भारतीय संस्कृतीचं आकर्षण आपल्याला वारंवार संपूर्ण जगभरात पाहायला मिळतं. भारतीय धार्मिक स्थळांवर देखील अनेक विदेशी पर्यटक दिसून येतात. वर्षभरात जवळपास लाखो विदेशी पर्यटक भारतातील विविध धार्मिक स्थळांना भेट देतात. मथुरा-वृंदावन, ऋषिकेश, प्रयाग काशी, केदारनाथ यांसारख्या अनेक तिर्थक्षेत्रांवर विदेशी आवर्जून येत असतात. दरम्यान, आता हे केवळ भारतातच नाही तर परदेशामध्ये देखील भारतीय संस्कृती दर्शन पाहायला मिळत आहे.

संपूर्ण जगामध्ये सर्वात शक्तिशाली असलेल्या अमेरिकेतील एक व्हिडीओ समोर आलेला आहे. हा व्हिडीओ पाहून सर्व भारतीयांची अभिमानाने मान उंचावलेली आहे. सध्या हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत असून यामध्ये एका मोठ्या स्टेडियममध्ये हजारो लहान मुलं एकत्र भागवत गीतेचा पाठ करत आहेत.

- Advertisement -

तुम्ही या व्हिडीओमध्ये पाहू शकता की, 2000 मुलं एकत्र भागवत कथेचं पठण करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, हा व्हिडीओ अमेरिकेच्या डलासमधील आहे. या ठिकाणी मुलांनी एकत्र मिळून भागवत कथेचं पठण केलं. ही मुलं मागील एका वर्षापासून तयारी करत होते. भगवत कथेचा पाठ करत या मुलांनी संपूर्ण जगभरात भारतीय संस्कृतीचा मान वाढवलेला आहे.


हेही वाचा :फायझर लस निर्मात्यासह पत्नीलाही चक्क कोरोनाची लागण, 4 डोस घेऊनही संसर्ग

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -