घरमुंबईमुंबईत धावणार इलेक्ट्रिक डबल डेकर बस, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

मुंबईत धावणार इलेक्ट्रिक डबल डेकर बस, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

Subscribe

मुंबई – देशातील पहिल्या वातानुकूलित डबल-डेकर इलेक्ट्रिक बस गुरुवारी बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अॅड ट्रोन्सपोर्ट उपक्रमाच्या ताफ्यात (BEST) सहभागी झाल्या. अधिकाऱ्यांनी दोन इलेक्ट्रिक बस दाखल झाल्याची माहिती दिली. सिंगल-डेकर इलेक्ट्रिक बस आणि अॅप आधारित प्रीमियम बस सेवेसाठी डबल डेकर वातानुकूलित बस दक्षिण मुंबईतील NCPA येथे आयोजित कार्यक्रमात लॉन्च करण्यात येणार आहेत.

या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत. यावेळी कॉफी टेबल बुकसह दोन पुस्तके प्रकाशित होणार आहेत. मात्र, कार्यक्रमापूर्वी काळ्या आणि लाल रंगाच्या डबल डेकर बस आणि निळ्या रंगाच्या सिंगल डेकर बसचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

- Advertisement -

बेस्टच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, या बसचे गुरुवारी सकाळी दक्षिण मुंबईतील मंत्रालयाजवळील एका कार्यक्रमात अनावरण होईल. या नंतर त्या बेस्ट उपक्रमाकडे सुपूर्द करण्यात येतील. विविध टप्प्यात 900 इलेक्ट्रिक बसेस पुरवण्याचे कंत्राट बेस्टने एका खासगी कंपनीला दिले आहे. त्यापैकी 50 टक्के बसेस मार्च 2023 पर्यंत आणि उर्वरित 50 टक्के बसेस त्यानंतर येणे अपेक्षित आहे.

- Advertisement -

मुंबईतील सार्वजनिक वाहतूक सेवा प्रदात्याची शहरात प्रीमियम अॅप-आधारित सार्वजनिक वाहतूक सुरू करण्याची योजना आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, प्रवाशांना मोबाईल ऍप्लिकेशनद्वारे त्यांची जागा बुक करावी लागेल. मात्र, त्यांना या प्रीमियम सेवेसाठी पारंपरिक बसेसच्या तुलनेत जास्त भाडे द्यावे लागू शकते.

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -