घरमनोरंजन'लाल सिंह चड्ढा'ची बॉक्स ऑफिसवरील कमाई पाहता नेटफ्लिक्सने देखील रद्द केला करार

‘लाल सिंह चड्ढा’ची बॉक्स ऑफिसवरील कमाई पाहता नेटफ्लिक्सने देखील रद्द केला करार

Subscribe

'लाल सिंह चड्ढा'ची बॉक्स ऑफिसवरील कमाई पाहून नेटफ्लिक्सने लाल सिंह चड्ढासोबत केलेला करार रद्द केला आहे.

बॉलिवूड अभिनेता आमीर खान याचा ‘लाल सिंग चड्ढा’ हा चित्रपट 11 ऑगस्ट रोजी प्रदर्शित झाला असून चित्रपट प्रदर्शित होऊन आता 11 दिवस पूर्ण झाले आहेत. मात्र, तरीही ‘लाल सिंग चड्ढा’ बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई करू शकला नाही. या चित्रपटाकडून आमीर खानला बऱ्याच अपेक्षा होत्या. मात्र चित्रपटासाठी कोटींचा खर्च केलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अद्याप 60 कोटींची देखील कमाई केली नाही. दरम्यान, आता नेटफ्लिक्सने देखील हा चित्रपट त्यांच्या प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्यास नकार दिला आहे.

ओटीटीवर प्रदर्शित होणार नाही लाल सिंह चड्ढा
सध्या प्रेक्षकांचा कल मोठ्या प्रमाणात ओटीटीकडे पाहायला मिळतो. त्यामुळे चित्रपटगृहात प्रदर्शित झालेले चित्रपट कालांतराने ओटीटीवर देखील प्रदर्शित केले जातात. मात्र लाल सिंह चड्ढा चे मोठ्या प्रमाणात झालेले नुकसान पाहून आता नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मने त्यांच्या प्लॅटफॉर्मवर चित्रपट प्रदर्शित करण्यास नकार दिला आहे.

- Advertisement -

नेटफ्लिक्सने रद्द केला करार
सूत्रांच्या माहितीनुसार, ‘लाल सिंह चड्ढा’ची बॉक्स ऑफिसवरील कमाई पाहून नेटफ्लिक्सने लाल सिंह चड्ढासोबत केलेला करार रद्द केला आहे.

आमीर खानचे 100 कोटींहून अधिक नुकसान

- Advertisement -

‘लाल सिंह चड्ढा’ चित्रपट प्रदर्शित होऊन 11 व्या दिवशीच्या चित्रपटाच्या कमाईबद्दल सांगायचे झाले तर, एका अहवालात नमूद केले आहे की आमिर खानच्या लाल सिंग चड्ढाला 100 कोटींहून अधिक नुकसान झाले आहे. दरम्यान, हा चित्रपट बनविण्यासाठी 180 कोटी एवढे बजेट होते. पण त्या तुलनेत हा चित्रपट तेवढी कमाई करू शकला नाही. बॉलिवूड मधील सलमान खान शाहरुख खान यांच्या फ्लॉप ठरलेल्या चित्रपटांपैकी आमिर खानचा लाल सिंघ चड्ढा हा चित्रपट खूपच फ्लॉप ठरला.

दरम्यान आमीर खानने एका मुलाखतीत सांगितले की, लाल सिंघ चड्ढा हा चित्रपट बनविण्यासाठी आम्ही 4 वर्षे या चित्रपटावर काम केले आहे. हा चित्रपट 60 कोटींपर्यंतच कामे करेल असं वर्तवण्यात आलं आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, चित्रपटाचे 180 कोटींचे बजेट पाहता, आणि चित्रपटाला प्रेक्षकांचा एवढा कमी प्रतिसाद बघता हा चित्रपट 100 कोटींपेक्षा अधिक कमाई करू शकणार नाही असंही बोललं जात आहे. या पूर्वी ठग्स ऑफ हिंदुस्थान हा आमीर खानचा चित्रपट फ्लॉफ ठरला होता.


हेही वाचा :लालसिंग चड्ढा चित्रपटाला १०० कोटींचा फटका

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -