घरताज्या घडामोडीअल कायदाशी संबंधित 34 हून अधिक लोकांना आसाम पोलिसांकडून अटक

अल कायदाशी संबंधित 34 हून अधिक लोकांना आसाम पोलिसांकडून अटक

Subscribe

अल कायदाशी संबंधित 34 हून अधिक लोकांना पोलिसांनी अटक केल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. आसाम पोलिसांनी ही कारवाई केली आहे. या कारवाईबाबत आसामचे डीजीपी भास्कर ज्योती महंता यांनी अधिक माहिती दिली.

अल कायदाशी संबंधित 34 हून अधिक लोकांना पोलिसांनी अटक केल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. आसाम पोलिसांनी ही कारवाई केली आहे. या कारवाईबाबत आसामचे डीजीपी भास्कर ज्योती महंता यांनी अधिक माहिती दिली. त्यानुसार, आसाम पोलिस असा कट यशस्वी होऊ देणार नाहीत, असे त्यांनी म्हटले. (Assam Police Arrest More Than 34 People Linked To Al Qaeda)

“बांगलादेशने इथे काही लष्करी छावण्याही उभारल्या आहेत. राज्यात काही नवीन गट झपाट्याने वाढत असून ते तरुणांना कट्टर बनविण्याचे काम करत आहेत. आसाममध्ये विविध प्रकारचे मदरसा गट आहेत. काही नवीन गट खूप वेगानं वाढत आहेत आणि त्याचा फायदा घेत आहेत. हा कट आसामबाहेर रचला जात आहे”, असेही डीजीपी भास्कर ज्योती महंता यांनी स्पष्ट केले.

- Advertisement -

याशिवाय, “आम्ही राज्यात कट्टरताविरोधी उपाययोजना राबवत आहोत. आम्ही या संदर्भात विविध मुस्लिम गटांशी संपर्क साधला आहे आणि त्यांनी सहकार्य केले आहे. आसाममध्ये अनेक मदरसे उगवत आहेत आणि त्यामुळे काही लोक त्याचा फायदा घेत आहेत”, अशी माहिती तेथील वरिष्ठ पोलिसांनी दिली.

काही महिन्यापूर्वी अमेरिकेने अल्- कायदाचा नेता अयमान अल्-जवाहिरीला अफगाणिस्तानमध्ये एका ड्रोन हल्ल्यात ठार केले होते. रविवार 31 जुलै रोजी अमेरिकेची केंद्रीय गुप्तचर यंत्रणा सीआयएने अफगाणिस्तानची राजधानी काबुलमध्ये दहशतवादविरोधी मोहीम राबवली होती. याच मोहिमेमध्ये जवाहिरीचा मृत्यू झाला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – कोल्हापुरात भूकंपाचे धक्के; 3.9 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -