घरअर्थजगत155.5 अब्ज डॉलर्स संपत्तीसह गौतम अदानी बनले जगातील दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती,...

155.5 अब्ज डॉलर्स संपत्तीसह गौतम अदानी बनले जगातील दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती, मुकेश अंबानींनाही टाकले मागे

Subscribe

आज 16 सप्टेंबर 2022 रोजी गौतम अदानी यांच्या संपत्तीत सर्वाधिक वाढ झाली आहे. आज त्यांची एकूण संपत्ती 4.9 अब्जने वाढली आहे.

अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी(gautam adani) 2022 मध्ये आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले, तेव्हापासून ते दररोज यशाची नवी उंची गाठत आहेत. गौतम अदानी यांच्या कामगिरीत आणखी एका विक्रमाची भर पडली आहे. फोर्ब्सच्या रिअल टाईम अब्जाधीशांच्या( real time billionaires) यादीत भारतीय उद्योगपती गौतम अदानी आज दुसऱ्या क्रमांकावर आले आहेत. त्यांनी फ्रेंच उद्योगपती बर्नार्ड अर्नॉल्ट यांना मागे टाकले होते. एका क्षणातच त्यांची एकूण संपत्ती 155.5 बिलियनवर पोहोचली होती, परंतु काही काळानंतर ते पुन्हा तिसऱ्या क्रमांकावर येऊन पोहोचले. सध्या अदानी यांची एकूण संपत्ती 155.2 अब्ज एवढी आहे. त्याच वेळी, टेस्ला आणि स्पेस एक्सचे मालक एलोन मस्क हे पहिल्या क्रमांकावर आहेत. त्यांची एकूण संपत्ती 273.5 अब्ज एवढी आहे.

हे ही वाचा – भारतीय अर्थव्यवस्था 2030मध्ये 10 ट्रिलियन डॉलरची होण्याच्या मार्गावर, केंद्रीय मंत्री हरदीपसिंग पुरी यांचे प्रतिपादन

- Advertisement -

आज गौतम अदानी यांच्या संपत्तीत सर्वाधिक वाढ

आज 16 सप्टेंबर 2022 रोजी गौतम अदानी यांच्या संपत्तीत सर्वाधिक वाढ झाली आहे. आज त्यांची एकूण संपत्ती 4.9 अब्जने वाढली आहे. इलॉन मस्कची एकूण संपत्ती 789 दशलक्षने वाढली आहे. त्याच वेळी, फ्रेंच उद्योगपती बर्नार्ड अर्नॉल्ट यांच्या संपत्तीमध्ये  3.1 अब्जची घट नोंदवली गेली आहे. याशिवाय अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस, मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांच्या संपत्तीतही 1 बिलियनची घट झाली आहे.

- Advertisement -

हे ही वाचा –  बस प्रवासात कार्ड किंवा क्यूआर कोडचा वापर करण्याची गरज, केंद्रीय मंत्री गडकरींचे मत

गौतम अदानी 2022 मध्ये आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत

वर्षाच्या सुरुवातीलाच भारतातील मोठे उद्योगपती मुकेश अंबानी(mukesh ambani) यांना मागे टाकत गौतम अदानी आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले. तेव्हापासून गौतम अदानी यांच्या संपत्तीत सातत्याने वाढ होत आहे. गेल्या आठवड्यात त्यांनी अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस यांना संपत्तीच्या बाबतीत अदानींच्या संपत्तीची वाढ पाहता, ते लवकरच बर्नार्ड अर्नॉल्ट यांना मागे टाकून दुसऱ्या क्रमांकावर येतील, असं सुद्धा बोललं जात आहे. दरम्यान मुकेश अंबानीबद्दल बोलायचे तर ते फोर्ब्सच्या रियल टाइम अब्जाधीशांच्या यादीत 8 व्या क्रमांकावर आहेत. त्यांची एकूण संपत्ती 92 अब्ज आहे.

हे ही वाचा – जागतिक अर्थव्यवस्थेत भारत पाचव्या स्थानावर, ब्रिटनलाही टाकलं मागे

nidhi pednekar
nidhi pednekarhttps://www.mymahanagar.com/author/nidhipednekar/
मागील ४ वर्षांपासून आकाशवाणीवर मुंबई येथे कंटेन्ट रायटर आणि अँकर म्हणून काम करण्याचा अनुभव, पॉलिटिकल पि.आर. मॅनेजमेंट क्षेत्रात काम करण्याचा अनुभव त्याचसोबत ललित, मनोरंजन, राजकीय घडामोडी, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -