घरमहाराष्ट्रनागपूर... म्हणून नितीन गडकरींसोबत माझं मन जुळतं, राज ठाकरेंनी केला खुलासा

… म्हणून नितीन गडकरींसोबत माझं मन जुळतं, राज ठाकरेंनी केला खुलासा

Subscribe

नागपूर – नितीन गडकरी जे करतात ते भव्यदिव्यच करतात.आमची मनं जुळण्याचं कारणच ते आहे. आम्ही दोघंही सगळं भव्यदिव्य करतो, असं राज ठाकरे आज फुटाळा तलावावर म्युझिकल फाऊंटन शो दरम्यान म्हणाले. राज ठाकरे आजपासून विदर्भ दौऱ्यवार असून पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेत आहे. आज ते भाजप नेते नितीन गडकरी यांच्यासोबत एकाच व्यासपीठावर होते. तेव्हा दोघांनीही एकमेकांविषयी तोंडभरून कौतुक केलं.

हेही वाचा – नागपुरात जागतिक दर्जाचे म्युझिकल फाऊंटन, राज ठाकरे-नितीन गडकरी फुटाळा तलावावर एकत्र

- Advertisement -

नागपुरात आज म्युझिकल फाऊंटनच्या कार्यक्रमाला राज ठाकरे आणि नितीन गडकरी यांनी भेट दिली. यावेळी नितीन गडकरी यांनी या फुटाळा तलवावारील म्युझिकल फाऊंटनच्या वैशिष्ट्याची माहिती दिली. हे फाऊंटन कसं भव्यदिव्य आणि जागतिक दर्जाचं आहे याविषयी सखोल माहिती दिली. तसेच, अशा कार्यक्रमांना राज ठाकरे सारख्या कलाकरांनी भेट देणं किती महत्त्वाचं आहे याविषयीही सांगितलं.

यावेळी राज ठाकरे म्हणाले की, “मी असं काही भारतात आजपर्यंत पाहिलं नाही. जे काही पाहिलं ते भारताच्या बाहेरच पाहिलं. नितीनजी जे करतात ते भव्यदिव्य असताच, ते खाली काही करतच नाही ते वरच करतात. आमची मनं जुळण्याचं कारण म्हणजे आम्ही दोघंही जे काही करतो ते भव्यदिव्य असतं. ते झाल्यावर कळतं की ते होऊ शकतं. नितीन गडकरी यांनी नागपुरला येण्याचं अजून एक कारण ठेवलं आहे. देशातील लोक हा शो पाहण्यासाठी नागपूरमध्ये येतील. त्यामुळे देशभरातील लोकांना येथपर्यंत पोहोचण्याकरता सुविधाही तशा मिळाव्यात.”

- Advertisement -

हेही वाचा दसरा मेळावा! दोन्ही गटांत शिवतीर्थासाठी चुरस; शिवाजी पार्क कोण गाजवणार?

एकदा शो बघितला की पुन्हा येऊ नका

म्युझिकल फाऊंटनचा शो एकदा बघितला पुन्हा पाहायला येऊ नका. कारण पुन्हा गर्दी नियंत्रणात आणणे शक्य होणार नाही. गर्दी वाढत गेली तर शो बंद करावा लागेल, असं नितीन गडकरी म्हणाले. तसंच,  सध्या दिवसाला दोन शो होत आहेत. पहिला शो सायंकाळी सात वाजता सुरू होतो. त्याची वेळ बदलून साडेसहा करण्याचा प्रयत्न करणार आहोत. जेणेकरून सायंकाळी तीन शो करता येतील, अशी माहिती नितीन गडकरी यांनी यावेळी दिली.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -