घरमहाराष्ट्रहैदराबादशिवाय भारत अपूर्ण, स्वातंत्र्य युद्धात आरएसएस-भाजप नव्हते; ओवैसींचा शाहांवर पलटवार

हैदराबादशिवाय भारत अपूर्ण, स्वातंत्र्य युद्धात आरएसएस-भाजप नव्हते; ओवैसींचा शाहांवर पलटवार

Subscribe

स्वातंत्र्य युद्धात आरएसएस भाजप नव्हते, आम्ही तेव्हाही होतो आणि अजूनही आहोत. हैदराबादशिवाय भारत अपूर्ण आहे, अशा शब्दात एआयएमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले आहे. 17 सप्टेंबर रोजी तेलंगणा दिनानिमित्त अमित शाह यांनी ओवैसी आणि राज्यातील सत्ताधारी केसीआर सरकारवर निशाणा साधला होता. व्होट बँकेच्या राजकारणामुळे टीआरएस अधिकृतपणे ‘हैदराबाद मुक्ती दिवस’ साजरा करण्याचे धाडस दाखवू शकत नाही, असे शाह म्हणाले होते. याच आरोपांवर आता ओवैसींनी पलटवार केला आहे.

‘हैदराबादशिवाय भारत अपूर्ण’

असदुद्दीन ओवैसी म्हणाले की, हैदराबादशिवाय भारत अपूर्ण आहे, हैदराबाद भारताशिवाय अपूर्ण आहे. ही गोष्ट समजून घेणे आवश्यक आहे. आम्ही विरोधक कधी होतो? अरे बाबा कुठे होतास? आम्ही त्यावेळी ही तिछे होतो, आजही आहोत आणि उद्याही राहू. स्वातंत्र्यलढ्यात आरएसएस नव्हता, भाजप नव्हता. 1947 मध्ये देश स्वतंत्र झाला, त्यातही हे नव्हते.

- Advertisement -

‘भारताचा भाग बनून हैदराबादचे लोक आनंदी’

आता हे येऊन सांगतात की, मी निष्ठावान आहे, मी निष्ठावान आहे. लोकांना काही ऐकू येत नाही. ते व्हॉट्सअॅप युनिव्हर्सिटीत येणाऱ्या गोष्टीच वाचतात आणि फॉरवर्ड करतात. असही ओवैसी एका रॅलीला संबोधित करताना म्हणाले.

अमित शाह नेमकं काय म्हणाले?

‘व्होट बँकेच्या राजकारणा’मुळे तेलंगणात ‘हैदराबाद मुक्ती दिन’ अद्याप अधिकृतपणे साजरा झाला नसल्याचा आरोप भाजपने केला होता. ‘हैदराबाद मुक्ती दिन’ सरकारच्या सहभागाने साजरा व्हावा, अशी परिसरातील जनतेची मागणी होती, असे अमित शहा म्हणाले होते, पण दुर्दैवाने 75 वर्षे उलटून गेली, मात्र येथे सत्तेवर बसलेल्या लोकांमुळे व्होट बँकेचे राजकारण करण्यासाठी ‘हैदराबाद मुक्ती दिन’ साजरा करण्याचे धाडस दाखवता आले नाही. असा आरोपही भाजपने केले आहे.


मुंबई- नाशिक राष्ट्रीय महामार्गाची दुरुस्ती करत वाहतुकीची कोंडी सोडवा; अजित पवारांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -