घरताज्या घडामोडीअमेरिकेत हवाई शर्यतीत विमानाचा भीषण अपघात; वैमानिकाचा मृत्यू

अमेरिकेत हवाई शर्यतीत विमानाचा भीषण अपघात; वैमानिकाचा मृत्यू

Subscribe

अमेरिकेतील नेवाडा येथे विमानांच्या वार्षिक शर्यतीदरम्यान रविवारी जेट विमान कोसळले आणि त्यात विमानातील वैमानिकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. अमेरिकेतील विमानाचा हा भीषण अपघात कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

अमेरिकेतील नेवाडा येथे विमानांच्या वार्षिक शर्यतीदरम्यान रविवारी जेट विमान कोसळले आणि त्यात विमानातील वैमानिकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. अमेरिकेतील विमानाचा हा भीषण अपघात कॅमेऱ्यात कैद झाला आहे. सोशल माडियावर या अपघाताचा व्हिडीओ व्हायरल होत असून, वेगाने उडणारे विमान जमिनीवर आदळून आगी लागल्याचे दिसत आहे. (viral video of jet crash during reno air race in us pilot dies)

मिळालेल्या माहितीनुसार, रेनो एअर रेसच्या चॅम्पियनशिप फेरीच्या शेवटच्या दिवशी ही घटना घडली. जेट गोल्ड रेसमधील तिसर्‍या लॅपमध्ये विमान जमिनीवर आदळले आणि इतर सर्व वैमानिकांना उतरण्यास भाग पाडले. या अपघातानंतर अधिकाऱ्यांनी अद्याप मृत वैमानिकाचे नाव सार्वजनिक केलेले नाही. मात्र, हा भीषण अपघात पाहण्यासाठी आलेल्या वैमानिक आणि त्याच्या कुटुंबियांप्रती त्यांनी शोक संवेदना व्यक्त केल्या आहेत.

- Advertisement -

“यूएस नॅशनल ट्रान्सपोर्टेशन सेफ्टी बोर्ड (NTSB) आणि फेडरल एव्हिएशन अॅडमिनिस्ट्रेशन (FAA) द्वारे सविस्तर तपासणी केली जाईल. आमच्याकडे या क्षणी कोणताही विशिष्ट डेटा नाही. पण जेट गोल्ड शर्यतीच्या तिसऱ्या लॅपमध्ये काय घडले ते आम्ही सांगू शकतो. एक जीवघेणा अपघात झाला”, असे रेसचे अध्यक्ष फ्रेड टेलिंग यांनी माहिती दिली.

शर्यतीत सहभागी असलेल्या इतर कोणत्याही विमानाचे नुकसान झाले नाही. या दुर्घटनेनंतर शर्यतीच्या शेवटच्या दिवशीचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले. दरम्यान, नेवाडा येथील रेनो स्टेड विमानतळावर दरवर्षी सप्टेंबरमध्ये रेनो रेस आयोजित केली जाते. या स्पर्धेत विविध प्रकारच्या विमानांमध्ये स्पर्धा होतात.

- Advertisement -

हेही वाचा – उत्तर प्रदेशच्या नोएडा सेक्टर- 21 येथील जलवायु विहार मध्ये भिंत कोसळून, 4 जणांचा मृत्यू

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -