घरपालघरमाजी आमदार विलास तरे आणि अमित घोडा भाजपात

माजी आमदार विलास तरे आणि अमित घोडा भाजपात

Subscribe

मध्यंतरी तरे यांचे देवेंद्र फडणवीस यांच्याशी जवळकीचे संबंध निर्माण झाले होते. त्यामुळेच तरे यांनी भाजपची वाट धरल्याचे सांगितले जाते.

वसई : शिवसेनेचे बोईसरचे माजी आमदार विलास तरे यांच्यासह पालघरचे माजी आमदार अमित घोडा यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत मुंबई येथे भाजप प्रवेश केला. शिवसेनेतून जिल्हा परिषद सदस्यत्व मिळालेल्या विलास तरे यांनी बहुजन विकास आघाडीत प्रवेश करून २००९ मध्ये बोईसर विधानसभा निवडणुकीत विजयी मिळवला होता. त्यानंतर २०१४ मध्येही बोईसर मतदारसंघातून तरे निवडून आले होते. मात्र, २००९ च्या निवडणुकीच्या तोंडावरच त्यांनी बहुजन विकास आघाडीला सोडचिठ्ठी देऊन शिवसेनेत प्रवेश केला होता. तरे यांना शिवसेनेत आणून तिकीट मिळवून देण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यावेळी मोठी भूमिका बजावली होती. मात्र, भाजपचे जिल्हा सरचिटणीस संतोष जनाठे यांनी बंडखोरी करत अपक्ष म्हणून निवडणूक लढवल्याने तरे यांचा अवघ्या तीन हजार मतांनी पराभव झाला होता. त्यानंतर तरे राजकीय वर्तुळात फारसे दिसत नव्हते. मध्यंतरी तरे यांचे देवेंद्र फडणवीस यांच्याशी जवळकीचे संबंध निर्माण झाले होते. त्यामुळेच तरे यांनी भाजपची वाट धरल्याचे सांगितले जाते.

राष्ट्रवादीमधून पक्षांतर करून शिवसेनेत गेलेल्या माजी आमदार कृष्णा घोडा यांचे २४ मे २०१५ रोजी निधन झाल्यानंतर फेब्रुवारी २०१६ मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांचे चिरंजीव अमित घोडा विजयी झाले होते. मात्र शिवसेनेने २०१९ मध्ये त्यांना तिकीट नाकारून त्यांच्याऐवजी भाजपचे माजी खासदार चिंतामण वनगा यांचे चिरंजीव श्रीनिवास वनगा यांना उमेदवारी दिली होती. तेव्हापासून अमित घोडा नाराज होते. तरे यांच्यासोबतच घोडा यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला आहे. घोडा यांच्या पत्नी अमिता घोडा पालघर जिल्हा परिषदेच्या सदस्या आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -