घरताज्या घडामोडीमोठ्या संघर्षानंतर अखेर अंकिताच्या पार्थिवावर एनएआयटी घाटावर अंत्यसंस्कार

मोठ्या संघर्षानंतर अखेर अंकिताच्या पार्थिवावर एनएआयटी घाटावर अंत्यसंस्कार

Subscribe

अखेर अंकिताच्या वडिलांनी गावकऱ्यांना समजूत घालत अंत्यसंस्कार करण्याची मागणी केली. त्यावेळी आंदोलकांनी माघार घेतली. त्यानंतर अखेर अंकिता भंडारीच्या पार्थिवावर एनएआयटी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

गेल्या पाच दिवसांपासून बेपत्ता असलेल्या अंकिता भंडारी या तरुणीची नदी फेकून हत्या करण्यात आली. हत्येनंतर अंकिताचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला होता. त्यावेळी शवविच्छेदना फेरफार केल्याचा आरोप करत पुन्हा शवविच्छेदन करण्याची कुटुंबीय आणि गावकऱ्यांनी मागणी केली. परंतु, पोलिसांनी नकार दिल्याने आंदोलन करण्यात आले. मात्र, अखेर अंकिताच्या वडिलांनी गावकऱ्यांना समजूत घालत अंत्यसंस्कार करण्याची मागणी केली. त्यावेळी आंदोलकांनी माघार घेतली. त्यानंतर अखेर अंकिता भंडारीच्या पार्थिवावर एनएआयटी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

अंत्यसंस्कारावेळी आंदोलकांनी 4 मागण्या केल्या. अंकिताचा अंतिम पोस्टमार्टम रिपोर्ट सार्वजनिक करावा. आरोपींना फाशी झालीच पाहिजे. अंकिताच्या कुटुंबाला 1 कोटी रुपये आणि कुटुंबातील एका सदस्याला नोकरी देण्यात यावी, अशा मागण्या त्यांनी केल्या. (ankita murder case ankita cremation in pauri srinaga)

- Advertisement -

दरम्यान, अंकिताच्या वडिलांनी सर्वांना आवाहन केल्याचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी सांगितले. त्याला धार्मिक विधी करायचे आहेत. सर्व कृती वेळेवर होत आहेत. अजिबात संकोच होणार नाही. सर्वांवर कडक कारवाई केली जाईल. एसआयटीने काम सुरू केले आहे.

आरोपी कोणीही असो, अशी घटना खपवून घेतली जाणार नाही. लवकरात लवकर कारवाई करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. फास्ट ट्रॅक असो की आरोपींना शिक्षा, आम्ही पूर्ण निर्धार आहोत. आम्हाला जी काही सरकारी मदत मिळेल, ती सरकार करेल.

- Advertisement -

अंकिता भंडारीच्या हत्येनंतर पोलिसांनी या हत्येची तपासणी करत अंकिताचा मृतदेह शोधण्यासाठी हे प्रकरण एसआडीआरएफला पाचारण केले. अंकिताचा मृतदेह सापडल्यानंतर शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. त्यावेळी शवविच्छेदनात फेरफार केल्याचा आरोप अंकिताच्या भावानी केला असून, पुन्हा शवविच्छेदन करण्याची मागणी केली. मात्र, पोलिसांनी त्याला नकार दिला. त्यामुळे अंकिताच्या कुटुंबियांसह संपूर्ण गावकऱ्यांनी अंकिताचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी घेण्यास नकार दिला होता.

या हत्येप्रकरणी रिसॉर्टचा संचालक माजी राज्यमंत्र्याचा मुलगा याला पोलिसांनी अटक केली आहे. अंकिताचा मृतदेह शोधण्यासाठी पोलिसांनी एसआडीआरएफला पाचारण केले होते.

या हत्याप्रकरणातील सर्व साक्षी पुरावे मिटवण्यात आल्याचा आरोप सोशल मीडियाद्वारे केला जात आहे. या आरोपात तथ्य नसल्याचा दावा अप्पर पोलीस अधिक्षक शेखर चंद्र सुयाल यांनी केला आहे. तसंच, याप्रकरणातील सर्व पुरावे पोलिसांकडे सुरक्षित असल्याचंही त्यांनी सांगितलं. पोलिसांकडे हे प्रकरण वर्ग करण्यात आल्यानंतर पोलिसांनी २२ सप्टेंबर रोजीच या हॉटेलचे व्हिडीओ काढले होते.

२३ सप्टेंबर रोजी सकाळीच फॉरेंसिक टीमने अंकिताच्या खोलीत आणि संपूर्ण रिसॉर्टमधील इलेक्ट्रॉनिक आणि वैज्ञानिक पुरावे जप्त केले होते. याप्रकरणी पोलिसांकडे पुरेसे पुरावे आहेत. ज्यामुळे आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा होऊ शकते. याप्रकरणी आता पुढील तपास एसआयटी करत असल्याचीही माहिती पोलिसांनी दिली.


हेही वाचा – ‘चलो अॅप’वर बेस्ट प्रवाशांना 19 रुपयांच्या तिकिटात मिळणार 9 बसफेऱ्यांची मुभा

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -