घरमहाराष्ट्रअशा अनेक धमक्या आल्या, मी त्याला भीक घालत नाही; मुख्यमंत्री शिंदेंची पहिली...

अशा अनेक धमक्या आल्या, मी त्याला भीक घालत नाही; मुख्यमंत्री शिंदेंची पहिली प्रतिक्रिया

Subscribe

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आत्मघातकी स्फोट घडवून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांना नक्षलवाद्यांकडून एका पत्राद्वारे ही धमकी देण्यात आली आहे. यावर आता खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. जीवे मारण्याची धमकी मिळाल्यानंतर पोलीस सुरक्षेची काळजी घेत आहे. यापूर्वीही अशा अनेक धमक्या आल्या आहेत. त्यामुळे या धमक्यांना मी भीक घातल नाही. अशा धमक्यांचा माझ्यावर परिणाम होणार नाही. धमक्यांमुळे मला जनतेमध्ये जाण्यापासून कोणी रोखू शकत नाही अशी प्रतिक्रिया राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. त्याचबरोबर गृहविभागाचे अधिकारी सुरक्षेबाबत योग्य ती काळजी घेच असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

अनेक वेळा यापूर्वी अशा धमक्या आल्या आहेत. अनेकवेळा नक्षल तसेच देश विघातक शक्तींनी असा प्रयत्न केला आहे. गडचिरोलीचे पालकमंत्री असतानाही असा प्रसंग ओढावला होता. त्यामुळे काही माझ्यासाठी नवीन नाही. मी जनतेतील माणूस आहे. मला जनतेत राहण्यास आवडते, त्यामुळे मला जनतेमध्ये जाण्यापासून रोखू शकत नाही. अशा धमक्यांमुळे माझ्या वागण्यात कोणताही परिणार होणार नाही. अशा बाबींचा परिणाम यापूर्वीही झालेला नाही आणि भविष्यातही होणार नाही.पोलिस विभाग याची काळजी घेतोय आणि अशा सूचना पोलिसांना देण्यात आल्या आहेत, असे मुख्यमंत्री शिंदे यावेळी म्हणाले.

- Advertisement -

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्राद्वारे जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. आत्तापर्यंत तब्बल तीन वेळेस त्यांनी अशाप्रकारे धमक्या देण्यात आल्या आहेत. यात आता आत्मघाती स्फोट घडवून शिंदेंना जीवे मारण्याचा कट रचला असल्याचेही सांगण्यात येत आहे.

या घटनेनंतर मुख्यमंत्री शिंदेंच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. तशा सुचनाही मुंबई पोलिसांना दिल्या आहेत. यात मुख्यमंत्री शिंदे यांच्या ठाण्यातील राहत्या घरी आणि वर्षा या सरकारी निवासस्थानाबाहेरील सुरक्षा वाढवण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आधीच माओवाद्यांनी जीवे मारण्याची धमकी दिली होती. नक्षलवाद्यांकडून शिंदेंना पाठवण्यात आलेल्या त्या पत्रात त्यांच्यासह कुंटुंबियांना जीवे मारण्याची धमकी किंवा जिवघेणा हल्ला होऊ शकतो अशी धमकी देण्यात आली आहे.

- Advertisement -

दरम्यान आत्ताच्या धमकीनंतर मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आला आहे. सुरक्षेच्या दृष्टीने गृहविभाग सक्षम आहे. उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस हे पाच वर्षे राज्याचे मुख्यमंत्री राहिले आहेत. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने योग्य त्या सुचना दिल्या आहेत. त्यामुळे समोरच्याने अशा धमक्याही देऊ नयेत असा इशाराही मुख्यमंत्री शिंदेंनी दिला आहे.


‘धन्यवाद, मोदीजी’ अभियानातून पंतप्रधानांना पाठवली जाणार 15 लाख लाभार्थ्यांची आभार पत्रं


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -