घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रदसर्‍याच्या मुहूर्तावर सोने खरेदी झाली स्वस्त; 'इतके' कमी झाले भाव

दसर्‍याच्या मुहूर्तावर सोने खरेदी झाली स्वस्त; ‘इतके’ कमी झाले भाव

Subscribe

नाशिक : दसरा हा वर्षभरातील सोन खरेदीच्या साडेतीन शुभ मुहूर्तापैकी एक प्रमुख दिवस मानला जातो. यादीवशी सराफी पेढ्यांवर ग्राहकांची मोठी गर्दी बघायला मिळते. मागील काही वर्षात सोन्याच्या भावात मोठी वाढ झाली आहे. मात्र, मागील दोन महिन्याच्या काळात सोन्याचे भाव तब्बल प्रती तोळा २ हजार रुपयांपर्यंत स्वस्त झाल्याने दसर्‍याच्या मुहूर्तावर सोने खरेदी करण्यासाठी ग्राहकांची तुलनेने अधिक गर्दी असेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

दसरा झाल्यानंतर काहीच दिवसात दिवाळी व त्यानंतर लग्नसराई सुरू होईल. त्यानिमित्तानेही दसर्‍याच्याच मुहूर्तावर सोन्याची खरेदी करून ठेवण्याकडे अनेक ग्राहकांचा कल असतो. यंदाच्या दसर्‍याच्या मुहूर्तावर सोन्याचे दर स्वस्त झाल्याने,आणि भविष्यात पुन्हा दर वाढण्याची शक्यता असल्याने आत्ताच सोने खरेदी करून ठेवण्याकडेही अनेकांचा कल दिसून येत आहे. अनेक ग्राहकांनी सराफी पेढ्यांमध्ये सोन्याच्या दागिन्यांची तसेच चोख सोन्याची आगवू बुकिंगही करून ठेवले आहे.

- Advertisement -

ऑगस्ट महिन्यात तब्बल ५३ हजार ८२० रुपयांपर्यंत जाऊन पोहचलेले सोन्याचे दर सद्यस्थितीत ५२ हजारांच्या दरम्यान आहेत. तर २२ कॅरेटच्या सोन्याचे दर ५१ हजार रुपयांवरून ४८ हजार रुपयांपर्यंत खाली आले आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणात सोन्याचे भाव कमी झाल्याने या संधीचा फायदा घेत सोन्याची लयलूट करण्याचा मानस अनेक ग्राहकांचा दिसून येतो. सोने ही सुरक्षित गुंतवणूक समजून सोन खरेदी करणार्‍यांचीही संख्या फार मोठी आहे. त्याचमुळे दर कमी झाल्याची संधी साधत अनेक ग्राहकांनी पितृपक्षातही सोन्याची मोठ्या प्रमाणात खरेदी केल्याच सराफी पेढ्यांनी सांगितलं.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -