घरक्रीडाटी-20 विश्वचषक : केएल राहुलकडे कर्णधारपद; सलग दुसऱ्या सामन्यात विराट कोहली संघाबाहेर

टी-20 विश्वचषक : केएल राहुलकडे कर्णधारपद; सलग दुसऱ्या सामन्यात विराट कोहली संघाबाहेर

Subscribe

येत्या काही दिवसांत टी-20 विश्वचषकाला सुरूवात होणार आहे. या विश्वचषकाच्या स्पर्धेपूर्वी भारतीय संघ जोरदार सराव करताना पाहायला मिळत आहे. कारण टी-20 विश्वचषकापूर्वी होत असलेल्या सराव सामन्यांमध्ये भारतीय चांगली कामगिरी करत आहे.

येत्या काही दिवसांत टी-20 विश्वचषकाला सुरूवात होणार आहे. या विश्वचषकाच्या स्पर्धेपूर्वी भारतीय संघ जोरदार सराव करताना पाहायला मिळत आहे. कारण टी-20 विश्वचषकापूर्वी होत असलेल्या सराव सामन्यांमध्ये भारतीय चांगली कामगिरी करत आहे. (India Team 2nd Unofficial Match Kl Rahul Captain virat kohli out)

पहिल्या अनऑफिशियल सराव सामन्यात त्यांनी वेस्टर्न ऑस्ट्रेलियाचा १३ धावांनी पराभव केला. आता या संघाविरुद्ध दुसरा अनऑफिशियल सराव सामना खेळवला जात आहे. हा सामनाही पर्थमध्येच होत आहे. आजचा सामना भारतीय संघ कर्णधार केएल राहुलच्या नेतृत्वाखाली खेळणार आहे.

- Advertisement -

टी-20 विश्वचषकापूर्वीच्या या सामन्यात भारतीय प्रथम गोलंदाजी करणार आहे. या सलग दुसऱ्या सराव सामन्यात विराट कोहलीला स्थान मिळालेले नाही. तर पहिल्या सामन्यातून बाहेर पडलेल्या केएल राहुलला या सामन्यात कर्णधारपद मिळाले आहे. रोहित शर्मा देखील संघात खेळत आहे. त्यानंतर भारतीय संघाला दोन ऑफिशिअल सराव सामनेही खेळायचे आहेत.

हे सामने ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडविरुद्ध अनुक्रमे 17 आणि 19 ऑक्टोबरला होणार आहेत. त्यानंतर टीम इंडिया २३ ऑक्टोबरला विश्वचषकातील पहिला सामना खेळणार आहे. दिवाळीच्या एक दिवस आधी हा सामना पाकिस्तानविरुद्ध मेलबर्न येथे होणार आहे.

- Advertisement -

सराव सामन्यात भारताचा अंतिम 11 संघ

रोहित शर्मा, केएल राहुल (कर्णधार), दीपक हुडा, ऋषभ पंत, हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक, अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, हर्षल पटेल, भुवनेश्वर कुमार आणि अर्शदीप सिंग.


हेही वाचा – आशिया चषक : भारतीय महिला क्रिकेट संघाची अंतिम फेरीत धडक, पाकिस्तानी स्टारचा मोडला विक्रम

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -