पतीच्या दीर्घायुष्यासाठी करवा चौथचा उपवास ठेवला जातो. यंदा 13 ऑक्टोबर रोजी संपूर्ण भारतात हा सण मोठ्या उत्साहात साजरा झाला. विवाहित महिलेकडून हे व्रत पूर्ण रीतिरिवाजांसह केले जाते. यंदा करवा चौथ उत्साहात बॉलिवूडच्या सौंदर्यवतीही मागे राहिल्या नाहीत. कतरिना कैफपासून मौनी रॉयपर्यंत अनेक नववधू अभिनेत्रींनी पहिला करवा चौथ सण साजरा केला. नुकतीच आई झालेली अभिनेत्री सोनम कपूरनेही लग्नाच्या चार वर्षांनी करवा चौथ सण पारंपारिक पद्धतीने साजरा केला, सोनम कपूरने पारंपारिक साजश्रृंगार करत हा सण साजरा केला. ज्याने सर्वांचीच मनं जिंकली. सोनम कपूरने या सेलिब्रेशनचे काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
यावेळी सोनमने लग्नाच्या 4 वर्ष झाल्यानंतरही करवा चौथचे व्रत का ठेवत नाही, याबाबत खुलासा केला आहे. या फोटोंमध्ये सोनम रेड कलरच्या पारंपारिक आऊटफिटमध्ये अगदी एखाद्या वधूप्रमाणे सुंदर सजली आहे. तिच्या या लुकने अनेकांची मनं जिंकली.
View this post on Instagram
या फोटोंसह सोनमने करवा चौथचं व्रत का ठेवत नाही याबाबत सांगितले की, माझे पती आनंद आहुजा करवा चौथ उपवासाचे चाहते नाहीत, म्हणून मी हे व्रत ठेवत नाही. पण कोणताही सण आणि परंपरा असो ते दोन कुटुंब एकत्र आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. असे आम्ही दोघे मानतो. मलाही हे सर्व आवडतं. माझी आई दरवर्षी हे व्रत खूप प्रेमाने साजरा करते आणि आज मीही या परंपरेचा एक भाग आहे. करवा चौखच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा.
सोनम कपूरने हे व्रत केले नसले तरी यावेळी तिने स्वत:ला ज्याप्रकारे साजश्रृंगाराने तयार केले ज्याने अनेकांना मोहिनी घातली. सोनमचा पती आनंद आहुजानेही तिच्या फोटोंवर कमेंट करत लिहिले की, ‘तू खूप सुंदर दिसत आहेस. इंटरमिटंट हे एक शक्तिशाली आणि एंटी इंफ्लेमेटरी साधन आहे आणि हो, आई सुनीता कपूर यांना करवा चौथ साजरी करताना पाहून आनंद झाला. त खूप खास होते.
अनिल कपूरची पत्नी सुनीता कपूर दरवर्षी करवा चौथ सणानिमित्त त्यांच्या घरी एक मोठा कार्यक्रम आयोजित करते, ज्यामध्ये बॉलीवूडमधील अनेक अभिनेत्री पाहुणे म्हणून हजेरी लावतात. यावेळीही शिल्पा शेट्टीपासून ते रवीना टंडन, रीमा कपूर, अरमान जैनची पत्नी अनिशा मल्होत्राआणि वरुण धवनची पत्नी नताशा दलाल करवा चौथची पूजा करण्यासाठी याठिकाणी पोहोचल्या होत्या. यादरम्यान यावेळी आई झाल्यानंतर सोनम कपूर पहिल्यांदाच सामील झाली होती.
View this post on Instagram
सोनम कपूर आणि आनंद आहुजा यांचा 8 मे 2018 रोजी शाही विवाह सोहळा पार पडला. या लग्नात सोनमचे मित्र आणि कुटुंबातील सदस्यही सामील झाले होते, ज्यात बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटीही सहभागी झाले होते. यानंतर 2022 वर्षाच्या सुरुवातीला या जोडप्याने आपण आई – बाबा होणार असे जाहीर केले. गेल्या महिन्यात 20 ऑगस्ट रोजी तिने एका गोंडस मुलाला जन्म दिला. यासोबतच काही महिन्यांपूर्वी त्यांनी एक पोस्ट शेअर करून आपल्या मुलाचे नाव वायू ठेवल्याचे सांगितले होते.
View this post on Instagram