घरमहाराष्ट्रछत्रपती संभाजीनगर...हा इव्हेन्ट करताना लार्जर दॅन लाईफ प्रतिमा दिसली, उदय सामंतांचे उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र

…हा इव्हेन्ट करताना लार्जर दॅन लाईफ प्रतिमा दिसली, उदय सामंतांचे उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र

Subscribe

औरंगाबादच्या दौऱ्यानिमित्त उद्धव ठाकरे यांची लार्जर दॅन लाईफ अशी प्रतिमा दिसली असा टोला राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केली आहे.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उद्धव ठाकरे (uddhav thackeray) सध्या औरंगाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. राज्यात ज्या भागात अतिवृष्टी झाली त्या भागाच्या दौऱ्यावर आहेत. या भागातील अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे उद्धव ठाकरे औरंगाबात जिल्ह्यांतील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची विचारपूस करत आहेत. दरम्यान सत्तांतरानंतर उद्धव ठाकरे पहिल्यांदाच औरंगाबादच्या दौऱ्यावर आले आहेत. दरम्यान उद्धव ठाकरेंच्या या दौऱ्यावर सत्ताधरी पक्षाकडून मात्र खोचक टीका केली जात आहे. औरंगाबादच्या दौऱ्यानिमित्त उद्धव ठाकरे यांची लार्जर दॅन लाईफ अशी प्रतिमा दिसली असा टोला राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत (uday samant) यांनी केली आहे.

याच संदर्भात मंत्री उदय सामंत यांनी पत्र लिहिले आहे. त्या पात्रात उदय सामंत म्हणले की,

- Advertisement -

महाराष्ट्रातील रहिवासी,
सस्नेह जय महाराष्ट्र ….
पत्रास कारण की,

उद्धव ठाकरे गटाचे पक्षप्रमुख शेतकऱ्यांच्या बांधावर 2 तासासाठी जाणार आहेत असे समजते. सत्ता गेल्यानंतरचा शेतकऱ्यांसाठीचा हा त्यांचा पहिलाच दौरा. ते मातोश्रीबाहेर पडुन आपल्या लक्झरी कारमध्ये बसून नंतर प्रायव्हेट चार्टर्ड विमानाने संभाजीनगर (औरंगाबाद) पोहचतील. तिथून पुढे लक्झरी कारने शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांसोबत फोटोसेशन करतील. हा Event करताना उद्धवजी यांची “लार्जर दॅन लाईफ” प्रतिमा दिसली पाहिजे याची त्यांचे फोटोग्राफर व्यवस्थित काळजी घेतील. या संपूर्ण दौऱ्यात उद्धवजींसमवेत मातोश्रीवरील उद्धवजींच्या कानात खुसुफुसणारे, कायम त्यांच्या मागे पुढे नाचणारे, शेतीचे पूर्ण ज्ञान नसलेले, शेतकाऱ्यांबाबत शून्य कळकळ असलेले सर्व “बडवे” सोबत असतील. हे “बडवे शेतकऱ्यांना उद्धवजींच्या जवळ येण तर सोडाच बोलू देखील देणार नाहीत. स्वतःच महत्व वाढवण्यासाठी शेतकऱ्यांच्या सगळ्या समस्या “बडवेच” उद्धवजींना सांगतील. केवळ प्रसिद्धीच्या हव्यासापोटी केलेल्या या लक्झरीयस दौऱ्यात / Event मध्ये उद्धवजी स्वतःचा छंद जोपासून शेतकऱ्यांचे फोटो काढतील.
त्या नंतर मुंबईत या फोटोचे प्रदर्शन भरऊन सेलिब्रिटींना आमंत्रण दिले जाईल. सेलिब्रिटी येतील… प्रदर्शन पाहतील….. उद्धवजींची फोटोग्राफी किती चांगली आहे !! याचे कौतुक करतील. त्यानंतर मातोश्रीवरील “बडवे ” शिवसेना नेत्यांना व शिवसैनिकांना प्रदर्शनातील फोटों बोली लावून खरेदी करण्याचे आदेश देतील. परंतु आदेश पाळणारे आणि वंदनीय बाळासाहेबांचा विचार हृदयात असणारे शिवसैनिक तिथे राहिले नाहीत याची सर्वांना जाणीव आहे. तुमचे शेतकऱ्यांच्या बांधावरचे दौरे नक्की कसे असतात हे आमच्यापेक्षा जास्त कुणाला माहिती नसेल म्हणून सर्वसामान्य जनतेच्या माहितीसाठी तुमच्या दौऱ्याचे हे प्रवासवर्णन करत आहे. आज खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचे अश्रू पुसणारी शिवसेना व शिवसैनिक ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सोबत आहे त्यामुळे बळीराजाची काळजी घ्यायला वंदनीय बाळासाहेबांची शिवसेना समर्थ आहे !! म्हणूनच सांगायला अभिमान वाटतो की

- Advertisement -

१) ३ वर्षांपूर्वी आपण जाहीर केलेले नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांसाठीचे ५० हजार रुपये आमच्या सरकारने
शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले आहे.

२) भूविकास बँकेमधून कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना कर्ज माफी दिली.

३) नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना NDRF पेक्षा दुप्पट मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे ४) नुकसान भरपाईसाठी 2 एकर जमिनीची मर्यादा 3 एकर केली आहे.
बळीराजा हा आपल्या सर्वांचा अन्नदाता आहे याची जाणीव आम्हाला प्रत्येकाला आहे. बळीराजाची काळजी आम्ही आताही घेतच आहोत आणि भविष्यात देखील घेत राहू.!!

कळावे,
लोभ असावा…..
आपला,
उदय सामंत
उपनेता, प्रवक्ता, बाळासाहेबांची शिवसेना

असं पत्र लिहीत मंत्री उदय सामंत यांनी खोचक टोला लगावत उद्धव ठाकरे यांच्या औरंगाबाद दौऱ्यावरून टीका केली आहे.


हे ही वाचा – धीर सोडू नका, सरकराला मदतीसाठी भाग पाडू; उद्धव ठाकरेंचे शेतकऱ्यांना आश्वासन

nidhi pednekar
nidhi pednekarhttps://www.mymahanagar.com/author/nidhipednekar/
मागील ४ वर्षांपासून आकाशवाणीवर मुंबई येथे कंटेन्ट रायटर आणि अँकर म्हणून काम करण्याचा अनुभव, पॉलिटिकल पि.आर. मॅनेजमेंट क्षेत्रात काम करण्याचा अनुभव त्याचसोबत ललित, मनोरंजन, राजकीय घडामोडी, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -