घरदेश-विदेश...तर देश राष्ट्रपती राजवटीच्या दिशेने जाईल; ममता बॅनर्जींचा दावा

…तर देश राष्ट्रपती राजवटीच्या दिशेने जाईल; ममता बॅनर्जींचा दावा

Subscribe

न्यायव्यवस्थेकडून जी दडपशाही होत आहे. त्यापासून लोकांना वाचविण्याचे आवाहन ममता बॅनर्जी यांनी केले.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी काही दिवसांपूर्वी देशातील लोकशाही संस्था चिरडली गेली आहे असा दावा केला होता. दरम्यान ममता यांनी आज पुन्हा या संदर्भांत चिंता व्यक्त केली आहे. हे जर का असेच सुरु राहिले तर देश राष्ट्रपती राजवटीच्या दिशेने जाईल असा इशारा देत ममता बॅनर्जी यांनी भारताचे सरन्यायाधीश उदय लळित यांना लोकशाही आणि संघीय संरचनेची सुरक्षा सुनिश्चित करण्याची विनंतीसुद्धा केली. (Where is the democracy? Mamata Banerjee raised the question before the Chief Justice)

सरन्यायाधीश उदय लळित आज पश्चिम बंगाल मधील कोलकाता येथे असलेल्या राष्ट्रीय न्यायवैद्यक विज्ञान विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभाला उपस्थित होते. ते विद्यापीठाचे कुलपती आहेत. दरम्यान या कार्यक्रमाला ममता बॅनर्जी संबोधित करत असताना बोलता होत्या.

- Advertisement -

न्यायव्यवस्थेकडून जी दडपशाही होत आहे. त्यापासून लोकांना वाचविण्याचे आवाहन ममता बॅनर्जी यांनी केले. समाजातील एका विशिष्ट वर्गाने सर्व लोकशाही सत्ता बळावली आहे असा दावाही मामता यांनी यावेळी केला. या दीक्षांत समारंभात प्रमुख पाहुणे असलेल्या सरन्यायाधीश यांच्यासमोर ममता यांनी लोकशाही कुठे आहे? असा प्रश्न उपस्थित करत लोकशाही वाचविण्याचे आवाहन केले. दरम्यान हीच चिंता ममता यांनी माध्यमांशी बोलताना सुद्धा हीच चिंता व्यक्त केली.

माध्यमांच्या पक्षपातीपणा बद्दलही ममता बॅनर्जी म्हणाल्या, ‘ते कोणाला शिवीगाळ करू शकतात का? कोणाला दोष देऊ शकतात का? साहेब, आमची प्रतिष्ठा ही आमची इज्जत आहे. इज्जत लुटली, तर सगळंच लुटले जाईल. ‘पुढे बोलताना ममता बनर्जी म्हणाल्या की, निकाल येण्यापूर्वीच अनेक गोष्टी केल्या जात होत्या. मला हे सांगताना खेद वाटतो आहे. जर तुम्हाला वाटत असेल की मी चुकीचे आहे, तर मी माफी मागते असंही पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या.

- Advertisement -

हे ही वाचा – कार्यकारी अभियंत्याच्या बदलीला स्थगिती, मॅटचा राज्य सरकारला दणका

nidhi pednekar
nidhi pednekarhttps://www.mymahanagar.com/author/nidhipednekar/
मागील ४ वर्षांपासून आकाशवाणीवर मुंबई येथे कंटेन्ट रायटर आणि अँकर म्हणून काम करण्याचा अनुभव, पॉलिटिकल पि.आर. मॅनेजमेंट क्षेत्रात काम करण्याचा अनुभव त्याचसोबत ललित, मनोरंजन, राजकीय घडामोडी, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -