घरदेश-विदेशराहुल गांधींच्या नेतृत्वातील सरकार केंद्रात हवे; मल्लिकार्जुन खर्गेंचे विधान

राहुल गांधींच्या नेतृत्वातील सरकार केंद्रात हवे; मल्लिकार्जुन खर्गेंचे विधान

Subscribe

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे केसीआर यांना फोनवरून आदेश देतात.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा (bharat jodo yatra) सुरु आहे. लवकरच ही यात्रा महाराष्ट्रात सुद्धा दाखल होणार आहे. दरम्यान मल्लिकार्जुन खर्गे यांनी काँग्रेच्या (congress) अध्यक्ष पदाची धुरा हाती घेतल्या नंतर ते काल 1 नोव्हेंबर रोजी पहिल्यांदाच भारत जोडो यात्रेत सहभागी झाले होते. भारत जोडो यात्रेदरम्यान हैद्राबादमध्ये सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी बोलताना ”केंद्रात गैर – भाजप सरकार स्थापन करायचे असेल तर ते केवळ काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वामधील सरकार असेल” असे विधान काँग्रेसचे नवनिर्वाचीत अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे(mallikarjun kharge) यांनी केले.

दरम्यन यावेळी बोलताना मल्लिकार्जुन खरगे यांनी तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (telangana cm k. chandrashekhar rao) यांच्यावरही टीकेजची तोफ डागली. “आम्ही संसदेत जेव्हा एखाद्या विधेयकाला विरोध करतो, त्याचवेळी टीआरएकडून त्याचे समर्थन केले जाते, तर दुसरीकडे केंद्रात गैर-भाजप सरकार स्थापन करण्याचा प्रयत्नसुद्धा ते करतात. मात्र, जर केंद्रात जर गैर-भाजप (bjp) सरकार स्थापन करायचे असेल तर ते केवळ राहुल गांधी  (rahul gandhi) यांच्या नेतृत्वामधील काँग्रेस सरकार असेल”, अशी वक्तव्य मल्लिकार्जुन खर्गे यांनी केले.

- Advertisement -

हे ही वाचा – अफगाणिस्तान – पाकिस्तानपासून युरोपसह भारताला पोलिओचा धोका

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीसुद्धा टीआरएसवर जोरदार टीका केली. “तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव हे थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संपर्कात असतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे केसीआर यांना फोनवरून आदेश देतात”. असंही राहुल गांधी म्हणाले.

- Advertisement -

विरोधकांच्या मुद्द्यावरून लक्ष हटवण्याचे काम टीआरएसकडून संसदेत केले जाते तेलंगणाचे मुख्यमंत्री निडणुकीपूर्वी भाजपकच्या विरोधात असल्याचे नाटक करतात. पण ते थेट पंतप्रधान नरेंद्र (pantpradhan narendra modi) मोदींच्या संपर्कात असतात”, अशी बोचरी टीका सुद्धा राहुल गांधी यांनी केली.

हे ही वाचा –  राजस्थानमधील मानगढ धाम राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित

nidhi pednekar
nidhi pednekarhttps://www.mymahanagar.com/author/nidhipednekar/
मागील ४ वर्षांपासून आकाशवाणीवर मुंबई येथे कंटेन्ट रायटर आणि अँकर म्हणून काम करण्याचा अनुभव, पॉलिटिकल पि.आर. मॅनेजमेंट क्षेत्रात काम करण्याचा अनुभव त्याचसोबत ललित, मनोरंजन, राजकीय घडामोडी, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -