घरमहाराष्ट्रसुषमा अंधारेंचे 'प्रबोधन' करण्यासाठी मलाच जावे लागेल; तृप्ती देसाईंचा टोला

सुषमा अंधारेंचे ‘प्रबोधन’ करण्यासाठी मलाच जावे लागेल; तृप्ती देसाईंचा टोला

Subscribe

भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई या राजकीय रणकंदनात उडी मारत उद्धव ठाकरे यांना सुषमा अंधारे यांच्या भाषणाकडे लक्ष देण्याची विनंती केली आहे.

शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे या त्यांच्या भाषणशैलीमुळे ओळखल्या जातात. त्या त्यांच्या भाषणामुळे नेहमी चर्चेत असतात. सध्या सुषमा अंधारे यांचा संपूर्ण महाराष्ट्रात दौरा सुरु आहे. महाप्रबोधिनी यात्रेनिमित्त या सध्या जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. पण आता सुषमा अंधारेंच्या (sushma andhare) भाषणावर बंदी घालण्यात आली आहे. अशातच भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई (trupti desai) या राजकीय रणकंदनात उडी मारत उद्धव ठाकरे यांना सुषमा अंधारे यांच्या भाषणाकडे लक्ष देण्याची विनंती केली आहे.

हे ही वाचा –  रवी राणांना आशीर्वाद फडवीसांचे; बच्चू कडूंचा गौप्यस्फोट

- Advertisement -

शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या भाषणावर तृप्ती देसाई यांनी आक्षेप घेतला आहे. महाप्रबोधन यात्रेवरून तृप्ती देसाई यांनी सुषमा अंधारे यांना लक्ष केले आहे. ”भाषणात आयला आणि आईच्या गावात हे शब्द वापरून महाप्रबोधन करणाऱ्याचे प्रबोधन करण्यासाठी मला जावे लागेल” असं म्हणत तृप्ती देसाई यांनी सुषमा अंधारे यांन खोचक टोला लगावला आहे. त्याचसोबत “उद्धव साहेब (uddhav thakceray) या भाषणांकडे लक्ष द्या” अशी थेट मागणीच तृप्ती देसाई यांनी उद्धव ठाकरे त्यांच्याकडे केली.

सुषमा अंधारेंच्या भाषणावर बंदी

- Advertisement -

सुषमा अंधारे आणि शरद कोळी यांनी गिरणगाव इथल्या सभेत गुलाबराव पाटील यांच्याविरोधात केलेले वक्तव्य त्यांना महागात पडल्याचे दिसले. सुषमा अंधारे आणि शरद कोळी (sharad koli)  यांनी केलेले भाषण फार आक्रमक होते अशी टीका गुलबराव पाटील यांच्या समर्थकांनी केली होती. म्हणूनच पोलिसात गुन्हा दाखल तक्रार दाखल करण्यात आल्याने सुषमा अंधारे आणि शरद कोळी यांच्या भाषणावर बंदी घालण्यात आली.

हे ही वाचा –  शेतकऱ्यांची दिवाळी दु:खात ; सरकार दिलासा देण्यात अपयशी, जयंत पाटलांची टीका

 

nidhi pednekar
nidhi pednekarhttps://www.mymahanagar.com/author/nidhipednekar/
मागील ४ वर्षांपासून आकाशवाणीवर मुंबई येथे कंटेन्ट रायटर आणि अँकर म्हणून काम करण्याचा अनुभव, पॉलिटिकल पि.आर. मॅनेजमेंट क्षेत्रात काम करण्याचा अनुभव त्याचसोबत ललित, मनोरंजन, राजकीय घडामोडी, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -