घरक्राइममुख्तार अन्सारीचा मुलगा अब्बासला 9 तासांच्या चौकशीनंतर ईडीकडून अटक

मुख्तार अन्सारीचा मुलगा अब्बासला 9 तासांच्या चौकशीनंतर ईडीकडून अटक

Subscribe

कुख्यात गुंड मुख्तार अन्सारीचा मुलगा आमदार अब्बास अन्सारी याला ईडीने शुक्रवारी रात्री उशिरा अटक केली आहे. अटकेपूर्वी ईडीने त्याची प्रयागराज कार्यालयात चौकशी केली. तब्बल 9 तास ईडीने चौकशी केली. मुख्तार अन्सारी यांच्या विरोधात नोंदवलेल्या मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने चौकशीसाठी अब्बास अन्सारी याला बोलावले होते.

कुख्यात गुंड मुख्तार अन्सारीचा मुलगा आमदार अब्बास अन्सारी याला ईडीने शुक्रवारी रात्री उशिरा अटक केली आहे. अटकेपूर्वी ईडीने त्याची प्रयागराज कार्यालयात चौकशी केली. तब्बल 9 तास ईडीने चौकशी केली. मुख्तार अन्सारी यांच्या विरोधात नोंदवलेल्या मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने चौकशीसाठी अब्बास अन्सारी याला बोलावले होते. मुख्तारचा भाऊ अफजल अन्सारीचा जबाब नोंदवल्यानंतर अब्बास अन्सारीच्या दुसऱ्या फेरीची चौकशी सुरू करण्यात आली. या चौकशीनंतर त्याला अखेर अटक करण्यात आली. (in money laundering case ed detained mukhtar son abbas ansari)

मनी लाँड्रिंग प्रकरणी प्राथमिक चौकशी केल्यानंतर त्याला ताब्यात घेण्यात आले. कागदोपत्री कारवाई पूर्ण झाल्यानंतर अब्बासची अटक करण्यात आली. अब्बासला अटक केली त्यावेळी सुरक्षेच्या कारणात्सव ईडी कार्यालयाबाहेर मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. अब्बास अन्सारी हा उत्तर प्रदेशातील मऊ विधानसभेचा आमदार आहे. ईडीने गेल्या महिन्यात अब्बास अन्सारीविरोधात लुकआउट नोटीस जारी केली होती.

- Advertisement -

मार्च 2021 मध्ये ईडीने मुख्तार अन्सारीविरुद्ध मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर ईडीने मुख्तारचा भाऊ आणि बसपा खासदार अफजल अन्सारी यांची 9 मे रोजी चौकशी करण्यात आली. त्यानंतर मुख्तारचा मोठा भाऊ सिबगतुल्ला अन्सारी आणि आमदार पुतण्या शोएब अन्सारी यांची 10 मे रोजी चौकशी करण्यात आली. तसेच, अब्बास अन्सारी आणि लहान मुलगा उमर अन्सारी यांची 20 मे रोजी चौकशी करण्यात आली होती.

तीन प्रकरणात गुन्हे दाखल

- Advertisement -

2020 मध्ये बनावट कागदपत्रे तयार करून सरकारी जमीन ताब्यात घेणे, लखनऊमध्ये फसवणूक करून मालमत्ता मिळवणे, आमदार निधीची फसवणूक केल्याप्रकरणी मुख्तार अन्सारीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तीन प्रकरणांच्या आधारे ईडीने मुख्तार अन्सारीविरुद्ध मनी लाँड्रिंगचा गुन्हाही दाखल केला आहे.

21 ऑक्टोबर रोजी आमदार अब्बास अन्सारी, भाऊ उमर अन्सारी यांच्यासह अनेक महिने फरार असलेले तीन जण निवडणूक आचारसंहितेचे उल्लंघन आणि अधिकाऱ्यांना धमकावणे, पोलिसांना चकमा देण्याच्या दोन प्रकरणात खासदार/आमदार न्यायालयात शरण आले होते. त्यानंतर तिघांनाही न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. मात्र सुमारे तीन तासांनंतर तिघांनाही जामीन मंजूर करण्यात आला. अब्बास अन्सारीसह तीन आरोपी तीन महिन्यांपासून फरार होते. यानंतर, आमदाराने सुप्रीम कोर्टात दिलासा देण्यासाठी अपील केले होते, ज्यावर अब्बास यांना लखनौमध्ये अवैध शस्त्रास्त्रे दाखल केल्याप्रकरणी अटकेपासून चार आठवड्यांचा अंतरिम दिलासा देण्यात आला होता.

यापूर्वी अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठाचे न्यायमूर्ती दिनेश कुमार सिंह यांच्या एकल खंडपीठाने अब्बास अन्सारीचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता. पोलिसांच्या अर्जावर खासदार/आमदार यांच्या विशेष न्यायालयाने अब्बास अन्सारी यांना फरार घोषित केले होते.


हेही वाचा – ‘महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला’; मुख्यमंत्र्यांकडून उदय लळीत यांच्याबाबत गौरवोद्गार

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -