घरमहाराष्ट्रसातारा महापालिका निवडणुकीवरून उदयनराजेंचा शिवेंद्रसिंह राजेंवर पलटवार; म्हणाले...

सातारा महापालिका निवडणुकीवरून उदयनराजेंचा शिवेंद्रसिंह राजेंवर पलटवार; म्हणाले…

Subscribe

दोन्ही डगरीवर हात ठेवणारा आमदार आता सैरभैर झालाय. त्यांना जनता थारा देणार नाही याची भीती वाटत असल्याने ते आता आमच्यावर टीका करत आहेत.

साताऱ्यातील राजकीय वर्तुळात रोजच नव्याने घडामोडी घडत आहेत. अशातच साताऱ्यामधील दोन्ही राजेंमधील वादाला पूर्णविराम लागत नाही आहे. या दोघांमध्ये दररोज आरोप – प्रत्यारोप होत आहेत. या वादात ठिणगी पडली आहे. ज्यांना जनतेनं मनापासून आणि कायमस्वरुपी पालिकेतून रिटायर्ड केलं, त्यांनी सातारा विकास आघाडीनं आता रिटायर्डमेंट घ्यावी, असा सल्ला देणं म्हणजे चोंबडेपणा आहे असा टोला खासदार उदयनराजे भोसले (udayanraje bhosale)यांनी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले (shivendrasinhraje bhosale) यांना लगावला आहे.

हे ही वाचा – राहुल गांधींना जीवे मारण्याची धमकी, मिठाईच्या दुकानात सापडले निनावी पत्र

- Advertisement -

याच संदर्भात उदयनराजे भोसले म्हणाले, प्रशासकीय राजवट लागून जवळपास एक वर्ष होत आले आहे. नागरिकांचे मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी सातारा विकास आघाडी काहीच करीत नाही अशी बोंब मारणाऱ्यांनी ज्यावेळी कासचं जलपूजन केलं, त्यावेळी सातारा विकास आघाडीचा संबंध काय अशी गरळ ओकत होते. नथीतून तीर मारण्याचा त्यांचा हा प्रकार जुनाच आहे. दोन्ही डगरीवर हात ठेवणारा आमदार आता सैरभैर झालाय. त्यांना जनता थारा देणार नाही याची भीती वाटत असल्याने ते आता आमच्यावर टीका करत आहेत.

हे ही वाचा – राहुल गांधींच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरे गप्प का? आशिष शेलारांचा सवाल

- Advertisement -

कुरतडलेली दाढी आणि भुरसट मिशांना पीळ देण्यापेक्षा प्रेमाने कोणाला आलिंगन देणे हे केव्हाही चांगले. त्यांच्यासारखे निदान आमच्या पोटात एक आणि ओठात एक असे तरी नाही, असा पलटवार उदयनराजे भोसले यांनी मिठ्या मारणे, पप्प्या घेणे या शिवेंद्रसिंहराजेंच्या टीकेवर केलाय. आम्ही हत्तीच्या चालीने चाललो आहोत. जे भुंकणारे आहेत त्यांच्याकडे आम्ही लक्ष देत नाही आहोत, असाही टोला त्यांनी शिवेंद्रसिंह राजे यांना लगावला. त्यामुळे आता टोलेबाजीचे राजकारणात पुढे काय होणार याकडे लक्ष लागून राहीले आहे.

nidhi pednekar
nidhi pednekarhttps://www.mymahanagar.com/author/nidhipednekar/
मागील ४ वर्षांपासून आकाशवाणीवर मुंबई येथे कंटेन्ट रायटर आणि अँकर म्हणून काम करण्याचा अनुभव, पॉलिटिकल पि.आर. मॅनेजमेंट क्षेत्रात काम करण्याचा अनुभव त्याचसोबत ललित, मनोरंजन, राजकीय घडामोडी, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -