राहुल गांधींच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरे गप्प का? आशिष शेलारांचा सवाल

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या निष्ठा, श्रद्धा आणि देशप्रेम यावर जेवढे आक्रमण करता येतील तेवढे आक्रमण काँग्रेसने केले आहे.

Ashish Shelar

काँग्रेस (congress) खासदार राहुल गांधी (rahul gandhi) हे सध्या भारत जोडो यात्रेत आहेत. काही दिवसांपूर्वी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. राहुल गांधींच्या या वक्तव्याचा राजकीय वर्तुळातून निषेध करण्यात येत आहे. याप्रकरणी मोठ्या प्रमाणात चर्चा सुद्धा होत आहेत. अशातच भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार (ashish shelar) यांनी पत्रकार परिषद घेऊन राहुल गांधी यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

पत्रकार परिषदेत आशिष शेलार म्हणाले; स्वातंत्रवीर सावरकर हे इंग्रजांचे नोकर होते असं राहुल गांधी म्हणाले ते बदनामीकारक आहेच, पण काँग्रेच्या अधिकृत मासिकात काही वर्षांपूर्वी स्वातंत्र्यवीर सावरकर समलैगिक होते असा आरोप काँग्रेसने केला हे जास्त भयंकर आहे असे आशिष शेलार म्हणाले. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या निष्ठा, श्रद्धा आणि देशप्रेम यावर जेवढे आक्रमण करता येतील तेवढे आक्रमण काँग्रेसने केले आहे.

राहुल गांधी (rahul ganhdi) जाणूनबुजून सावरकरांचा अपमान करत आहे. हा सावरकरांचा अपमान आहेच पण त्यासोबतच महाराष्ट्राचा आणि देशभक्त भारतीयांचाही हा अपमान आहे. एक मराठी माणूस ज्याने भारताच्या स्वातंत्र्यासाठी काळ्या पाण्याची शिक्षा भोगली पण झुकला नाही. त्या सावरकरांचा अपमान म्हणजे महाराष्ट्राचा अपमान आहे असेही आशिष शेलार म्हणाले. त्याचसोबत मराठी माणसाचा, देशाचा आणि राज्याचा अपमान काँग्रेस करत आहे आणि शिवसेना सत्तेत येण्यासाठी माती खात आहे आणि बोटचेपी भूमिका घेऊन केवळ इशारा देत आहे.

याच संदर्भात शेलार पुढे म्हणाले, मणिशंकर अय्यर हे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविरोधात बोलले तेव्हा बाळासाहेब ठाकरे (balasaheb thackeray) यांनी त्यांच्या पुतळ्याच्या कानशिलात लगावली आणि भारत जोडो यात्रेत आदित्य ठाकरे राहुल गांधींना झप्पी देत आहेत असा खोचक टोला शेलारांनी लगावला. आदित्य ठाकरे गप्प का? ते राहुल गांधीच्या विधानाचा निषेध का करत नाहीत असा सवाल सुद्धा शेलार यांनी उपस्थित केला. ठाकरे गट विपर्यासाचे राजकारण करत आहेत आणि म्हणूनच उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना महाराष्ट्र आणि जनता माफ करणार नाही. असे शेलार म्हणाले.

महाराष्ट्राचा आणि मराठी माणसाचा अपमान करायचा आहे आणि त्यांना या देशातील हिरव्यांना खुश करायचे आहे म्हणून राहुल गांधी अशाप्रकारचे विधान करत आहेत असे आशिष शेलार (ashish shelar) म्हणाले.


हे ही वाचा – महाविकास आघाडीला कोणताही धोका नाही, जयराम रमेश यांचा दावा