घरमहाराष्ट्रनीलम गोऱ्हेंकडून लोकसभा अध्यक्षांची भेट; मुख्यमंत्री शिंदेही उपस्थित, चर्चांना उधाण

नीलम गोऱ्हेंकडून लोकसभा अध्यक्षांची भेट; मुख्यमंत्री शिंदेही उपस्थित, चर्चांना उधाण

Subscribe

महाराष्ट्रातील वसई परिसरात राहणाऱ्या श्रद्धा हत्येप्रकरणी योग्य ते लक्ष घालून कार्यवाही करण्यासाठी निर्देश दिले असल्याची माहिती लोकसभेचे अध्यक्ष ओम प्रकाश बिर्ला यांनी महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांना मुंबईत दिली

मुंबईः गेल्या काही दिवसांपासून ठाकरे गटाचे काही नेते शिंदे गटात प्रवेशकर्ते होत आहेत. शिवसेनेचे खासदार गजानन कीर्तिकर यांनीसुद्धा शिंदे गटात प्रवेश केलाय. त्यानंतर आता शिवसेनेचे आणखी काही नेते शिंदे गटाच्या वाटेवर असल्याचं बोललं जात आहे. महाराष्ट्रातील महिला अत्याचाराच्या घटनेवर लक्ष घालण्यासाठी विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी लोकसभा अध्यक्ष ओम प्रकाश बिर्ला यांची भेट घेतली होती. त्या भेटीदरम्यान राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसुद्धा उपस्थित होते. विशेष म्हणजे त्यानंतर एकनाथ शिंदे आणि नीलम गो-हे यांचीसुद्धा एक स्वतंत्र भेट झाली आहे. त्यामुळे नीलम गो-हेसुद्धा शिंदे गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत.

महाराष्ट्रातील वसई परिसरात राहणाऱ्या श्रद्धा हत्येप्रकरणी योग्य ते लक्ष घालून कार्यवाही करण्यासाठी निर्देश दिले असल्याची माहिती लोकसभेचे अध्यक्ष ओम प्रकाश बिर्ला यांनी महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांना मुंबईत दिली. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसुद्धा उपस्थित होते. मुंबईमध्ये झालेल्या भेटीदरम्यान या विषयावर त्यांनी चर्चा केली, डॉ. गोऱ्हे यांनी लोकसभेच्या अध्यक्षांना लेखी निवेदन दिले.

- Advertisement -

तसेच महाराष्ट्रामध्ये सुरू असलेल्या घडामोडींची माहिती दिली. महिलांच्या सुविधांसाठी समाजामध्ये मोक्याच्या ठिकाणी पायाभूत सुविधांचा विकास व्हावा. केंद्रीय पुरातत्त्व विभागाचे महाराष्ट्रातील दुर्ग, मंदिरे याकडील दुर्लक्ष याकडे लक्ष वेधले. लष्करात आणि महत्त्वाच्या ठिकाणी काम करणाऱ्या महिलांच्या सुरक्षिततेसाठी आणि आत्मसन्मानासाठी योग्य त्या उपाययोजना केल्या जाव्यात. श्रद्धा वालकरच्या केसमध्ये पकडला गेलेला आरोपी याला फाशीची शिक्षा सुनावण्याबाबत योग्य ती कार्यवाही व्हावी, अशा स्वरूपाच्या मागण्या या निवेदनामध्ये त्यांनी केल्यात.

याप्रकरणी महाराष्ट्र राज्य सरकारने विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करावी, अशी मागणी यावेळी डॉ. गोऱ्हे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली, त्यावर त्यांनी त्वरित संमती देत याबाबत कार्यवाही करीत असल्याचे सांगितले. या भेटीमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेही उपस्थित होते. त्यांनी यावेळी डॉ. गोऱ्हे यांची वालकर केसमध्ये दिल्ली पोलिसांना सहाय्यासाठी विशेष सरकारी वकील नेमण्याची अपेक्षा मान्य केली, तसेच महिलाविषयक कामाची प्रशंसा देखील केली. यावर लोकसभा अध्यक्षांनी त्वरित संमती दर्शवली. संसदीय कार्य समितीच्या बैठकांना नीलमताईं गो-हेंची उपस्थिती नेहमीच असते, असेही बिर्ला यांनी यावेळी सांगितले.

- Advertisement -

हेही वाचाः जेल आहे की मसाज पार्लर? ‘आप’च्या नेत्याला जेलमध्ये मिळतेय VIP ट्रीटमेंट

Vaibhav Desai
Vaibhav Desaihttps://www.mymahanagar.com/author/vaibhavr/
गेल्या 14 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत; प्रिंट मीडिया चार वर्षे अनुभव, डिजिटल माध्यमाचा साडेनऊ वर्षांचा अनुभव आहे. तसेच अर्थकारण विषयावर लिखाणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -