घरदेश-विदेशश्रद्धा वालकर हत्या प्रकरणातील आरोपी आफताबला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

श्रद्धा वालकर हत्या प्रकरणातील आरोपी आफताबला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

Subscribe

हा निर्णय घेण्यापूर्वी पोलिसांनी त्यांना आंबेडकर रुग्णालयात नेले होते. येथूनच तो व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयात हजर झाला.

संपूर्ण देशाला हादरवून टाकणाऱ्या श्रद्धा वालकर हत्या प्रेरकारणासंबंधी मोठे वृत्त समोर येत आहे. श्रद्धाचा आरोपी आफताबला शनिवारी 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. हा निर्णय घेण्यापूर्वी पोलिसांनी त्यांना आंबेडकर रुग्णालयात नेले होते. येथूनच तो व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयात हजर झाला. आफताबला आज तिहार तुरुंगात नेण्यात येणार आहे. विशेष पोलीस आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) सागरप्रीत हुडा यांनी सांगितले की, दिल्ली पोलिसांनी या प्रकरणी आंबेडकर रुग्णालयात न्यायालय स्थापन करण्यात यावे, अशी विनंती न्यायदंडाधिकाऱ्यांना केली होती.

याच संदर्भांत पोलिसांनी सांगितले की, आफताबची आयपीसी कलम 365/302/201 अंतर्गत पॉलिग्राफ चाचणी 25 नोव्हेंबर पर्यंत करता आली नाही. तर दुसरीकडे, विशेष पोलिस आयुक्त हुड्डा यांनी सांगितले की, त्यांना श्रद्धा वालकरच्या मृतदेहाचा डीएनए अहवाल अद्याप मिळालेला नाही. तर, 16 नोव्हेंबर रोजी दिल्ली पोलिसांनी श्रद्धाचे वडील विकास वालकर यांच्या डीएनएचा नमुना तपासणीकरिता घेतला होता. पोलीस हा डीएनए जंगलात सापडलेल्या मृतदेहाच्या डीएनएशीही जुळवून पाहणार आहेत.

- Advertisement -

यासर्व प्रकरणी आज आणखी एक महत्वाची माहिती समोर आली ती म्हणजे, श्रद्धा वालकर हत्या प्रकरणातील आरोपी आफताब पूनावालाची पॉलीग्राफी टेस्ट पूर्ण झाली आहे. आता फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटकीची (FSL) टीम त्याची तपासणी करणार आहे. मात्र गरज भासल्यास आफताबला शनिवारी चौकशीसाठी बोलवले जाणार आहे. तर सोमवारी आफताबची नार्को टेस्ट केली जाण्याची शक्यता आहे. ही टेस्ट सुमारे 3 तास चालणार आहे. दरम्यान आधीच्या पॉलीग्राफ टेस्टदरम्यान आफकाबने अनेक खुलासे केले आहेत. त्याचवेळी श्रद्धा वालकरच्या हत्येनंतर आफताबने ज्या मुलीला घरी बोलावले होते, त्याचाही छडा लागला आहे.

श्रद्धाच्या हत्येनंतर आरोपी आफताबने नेमक्या कोणत्या मुलीला घरी बोलावले? तिचे नाव आणि इतर माहिती समोर आलेली नाही. मात्र ही तरुणी व्यवसायाने डॉक्टर असल्याचे सांगितले जात आहे. आफताबचे या तरुणीशी काय संबंध आहेत, याचा तपास पोलीस करत आहेत.

- Advertisement -

आरोपी आफताब त्याच्या मोबाईलवर बंबल हे डेटिंग अॅप युज करायचा. याच डेटिंग अॅपमधून तो एका मुलीच्या संपर्कात आला होता, जिला त्याने आपल्या घरी बोलावले होते. पोलिसांनी त्या मुलीची ओळख पटवली आहे. ती पेशाने ही मुलगी डॉक्टर आहे. श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे केल्यानंतर आफताबने ते फ्रीजमध्ये ठेवले आणि त्यानंतर या मुलीला घरी बोलावले होते.


हे ही वाचा – ब्राझीलमध्ये अल्पवयीन आरोपीकडून शाळांमध्ये गोळीबार; तिघांचा मृत्यू, 11 जखमी

nidhi pednekar
nidhi pednekarhttps://www.mymahanagar.com/author/nidhipednekar/
मागील ४ वर्षांपासून आकाशवाणीवर मुंबई येथे कंटेन्ट रायटर आणि अँकर म्हणून काम करण्याचा अनुभव, पॉलिटिकल पि.आर. मॅनेजमेंट क्षेत्रात काम करण्याचा अनुभव त्याचसोबत ललित, मनोरंजन, राजकीय घडामोडी, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -