घरताज्या घडामोडी..म्हणून मुख्यमंत्री ४० रेड्यांचे बळी देण्यासाठी गुवाहाटीला, खासदार संजय राऊतांनी सांगितलं 'कारण'

..म्हणून मुख्यमंत्री ४० रेड्यांचे बळी देण्यासाठी गुवाहाटीला, खासदार संजय राऊतांनी सांगितलं ‘कारण’

Subscribe

महाराष्ट्रात ज्ञानेश्वरांनी रेड्याकडून वेद वदवून घेतले...

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आज विदर्भ दौऱ्यावर आहेत. चिखलीत ठाकरेंचा शेतकरी मेळावा आहे. यावेळी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि ४० आमदारांवर टीका केली आहे.  पेटलेल्या मशाली गद्दारांचे खोके बेचिराख केल्याशिवाय राहणार नाही. ही भूमी राष्ट्रमाता जिजाऊंची भूमी आहे. ज्या राष्ट्रमाताने आम्हाला छत्रपती हिंदवी स्वराज्य संस्थापक शिवाजी राजा दिला. त्या भूमीत गद्दारीची बीजं रोवली गेली आहेत. ही कायमची उखडून फेकण्यासाठी या मशाली पेटलेल्या आहेत. या संतांच्या महाराष्ट्रात ज्ञानेश्वरांनी रेड्याकडून वेद वदवून घेतले आणि आता मुख्यमंत्री ४० रेड्यांचे बळी देण्यासाठी गुवाहाटीला गेले, असा टोला संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला आहे.

बुलढाण्यात किती खोके आले?, सर्वात जास्त खोके बुलढाण्यात आले आहेत. एक फुल, दोन हाफ, एक खासदार आणि आमदार आहेत. आज गुवाहाटीत देवीला नवस बोलायले गेले आहेत. मग महाराष्ट्रातले देव संपले का?, सर्वात मोठी देवता या बुलढाणा जिल्ह्यात आहे. राष्ट्रमाता जिजाऊ, रेणूका मातेचं मंदीर या बुलढाण्यात आहेत. तरीसुद्दा रेडे गुवाहाटीला गेले. हा संतांचा महाराष्ट्र आहे. या संतांच्या महाराष्ट्रात ज्ञानेश्वरांनी रेड्याकडून वेद वदवून घेतले आणि आता मुख्यमंत्री ४० रेड्यांचे बळी देण्यासाठी गुवाहाटीला गेले. काय दुर्दैव आहे या राज्याचं..एकही खोकेवाला परत निवडून जाता कामा नये, अशी शपथ आपण घेतली पाहिजे, असं संजय राऊत म्हणाले.

- Advertisement -

शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्यासाठी १०० दिवस काय जन्मठेप भोगायलाही मी तयार आहे. ज्या पक्षाने आणि शिवसेनेने महाराष्ट्र आणि देशाला दिलं आहे. त्या शिवसेनेसाठी हे लाखो शिवसैनिक जिवाची कुर्बानी द्यायला तयार आहेत. मग त्यांच्यासाठी एक संजय राऊत कुर्बान झाला तर मग काय झालं?, आमच्यावर कितीही अन्याय, अत्याचार केले तरी हे लाखो शिवसैनिक तुम्हाला विकत घेता येणार नाही, असं संजय राऊत म्हणाले.

आज संविधान दिवस आहे. आजच्या दिवशी आपली भारतीय घटना निर्माण झाली. अंमलात आली. पण राज्य कायद्यानं चाललंय का, तर अजिबात नाही हे राज्य बेकायद्याने चाललं आहे. या महाराष्ट्रात संविधान दिवस साजरा करण्याचा अधिकार नाही. कारण एक बेकायदेशीर सरकार आपल्या बोडक्यावर बसवलं आहे आणि ते लवकरच जाणार… मी तुरुंगात जाताना माझ्या हातात भगवा होता. परंतु शेवटच्या श्वासापर्यंत हा भगवा माझ्यासोबत राहील, असं मी सांगत होतो आणि तो राहणार आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे २५ खासदार आणि किमान ११५ आमदार आपण निवडून द्यायला हवेत. शिवसेनेचा मुख्यमंत्री स्वबळावर निर्माण करून या रेड्यांचा राजकीय बळी आपण घेतला पाहीजे, असं राऊत म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा : पर्यटनाच्या माध्यमातून स्थानिकांना रोजगार उपलब्ध होतील, मंगलप्रभात लोढा यांचा


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -