घरराजकारणगुजरात निवडणूकगुजरातमध्ये फोडाफोडीचं राजकारण, भाजपाच्या माजी मंत्र्याचा काँग्रेसमध्ये प्रवेश

गुजरातमध्ये फोडाफोडीचं राजकारण, भाजपाच्या माजी मंत्र्याचा काँग्रेसमध्ये प्रवेश

Subscribe

अहमदाबाद – गुजरातमध्ये निवडणुकीच्या प्रचाराला वेग आला असून फोडाफोडीचं राजकारण सुरू आहे. भाजपाने इतर पक्षातील अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नेत्यांना आपल्याकडे वळवून घेतले असताना एका माजी मंत्र्याने भाजपाला सोडचिठ्ठी दिली आहे. हा माजी मंत्री काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची चर्चा आहे.

हेही वाचा – Gujarat Election: केजरीवालांना मोठा धक्का, ‘आप’च्याच उमेदवाराने दिले भाजपाला समर्थन

- Advertisement -

भाजपा, काँग्रेस आणि आपने गुजरात निवडणुकीसाठी प्रयत्न पणाला लावले आहेत. तिहेरी लढत सुरू असताना फोडाफोडीचेही राजकारण सुरू आहेत. त्यातच, माजी मंत्री जय नारायण व्यास आज अहमदाबाद येथील काँग्रेसच्या कार्यालयात दाखल झाले होते. त्यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.

जय नारायण व्यास हे भाजपचे विश्वासू मानले जात होते. केशुभाई आणि नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री होते तेव्हा जय नारायण व्यास हे दोन्ही सरकारमध्ये मंत्री राहिले आहेत.

- Advertisement -

आपमध्येही बंडखोरी

कच्छ जिल्ह्यातील अबडासा विधानसभा मतदारसंघासाठी ‘आप’ने वसंत वलजीभाई खेतानी यांना उमेदवारी दिली होती. मात्र, रविवारी त्यांनी पक्षाचा राजीनामा दिला आणि भाजपा उमेदवार प्रद्युम्न सिंह जडेजा यांना मतदान करण्याचे आवाहन केले. गेल्या निवडणुकीत भाजपाने काँग्रेसच्या उमेदवारांना धोबीपछाड केले होते. मात्र, आता या निवडणुकीत मतदानाच्या आधीच ‘आप’च्या उमेदवारांनी हार पत्कारली आहे.

हेही वाचा – गुजरातमध्ये आम्हीच जिंकू; केजरीवालांची कागदावर लिहून भविष्यवाणी

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -