घरराजकारणगुजरात निवडणूकGujarat Election: केजरीवालांना मोठा धक्का, 'आप'च्याच उमेदवाराने दिले भाजपाला समर्थन

Gujarat Election: केजरीवालांना मोठा धक्का, ‘आप’च्याच उमेदवाराने दिले भाजपाला समर्थन

Subscribe

यंदाच्या विधानसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार, सत्तांतर होणार की भाजपाच सत्तेवर बसणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. या सर्वांमध्ये आपची भूमिका फार मोलाची आहे. कारण, भाजप आणि काँग्रेस या पारंपरिक आणि जुन्या पक्षांसह आपनेही आपले प्रयत्न पणाला लावले आहेत. 

अहमदाबाद – गुजरातमध्ये निवडणुकीच्या (Gujarat Election 2022) प्रचाराचा धुराळा उडाला आहे. जाहीरनामा (Manifesto) आणि आश्वासनं देत गुजरातवासियांना आकर्षित करण्याचा प्रयत्न सर्वच पक्षांतून केला जातोय. त्यातच, या निवडणुकीत आपच (Aam Adami Party) गुजरातमध्ये सत्तेवर येईल असा दावा काल अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी कागदावर लिहून केला होता. त्यांच्या या दाव्याला २४ तास उलटत नाही तोवर त्यांना मोठा धक्का बसला आहे. वसंत खेतानी (Vasant Khetani) यांनी आपने दिलेली उमेदवारी मागे घेत भाजपाला समर्थन करणार असल्याचं जाहीर केलं आहे.

हेही वाचा – काँग्रेसने व्होट बँकेसाठी दहशतवादाला पोसले; पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप

- Advertisement -

यंदाच्या विधानसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार, सत्तांतर होणार की भाजपाच सत्तेवर बसणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. या सर्वांमध्ये आपची भूमिका फार मोलाची आहे. कारण, भाजप आणि काँग्रेस या पारंपरिक आणि जुन्या पक्षांसह आपनेही आपले प्रयत्न पणाला लावले आहेत.

हेही वाचा – गुजरातमध्ये आम्हीच जिंकू; केजरीवालांची कागदावर लिहून भविष्यवाणी

- Advertisement -

कच्छ जिल्ह्यातील अबडासा विधानसभा मतदारसंघासाठी ‘आप’ने वसंत वलजीभाई खेतानी यांना उमेदवारी दिली होती. मात्र, रविवारी त्यांनी पक्षाचा राजीनामा दिला आणि भाजपा उमेदवार प्रद्युम्न सिंह जडेजा यांना मतदान करण्याचे आवाहन केले. गेल्या निवडणुकीत भाजपाने काँग्रेसच्या उमेदवारांना धोबीपछाड केले होते. मात्र, आता या निवडणुकीत मतदानाच्या आधीच ‘आप’च्या उमेदवारांनी हार पत्कारली आहे.

मुख्यमंत्री पदाच्या दावेदाराला विरोध

गुजरात ‘आप’मध्ये अंतर्गत वाद आहेत. विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने हा वाद आता चव्हाट्यावर येऊ लागला आहे. आप सत्तेवर आल्यास इसुदान गढवी मुख्यमंत्री होऊ शकतील, मात्र, इसुदान गढवी यांना पक्षाकडून विरोध आहे. आपमधील अनेक नेते गढवीवर नाराज आहेत. वसंत खेतानीसुद्धा त्यातील एक होते. म्हणूनच त्यांनी पक्षाचा राजीनामा दिला. यामुळे अरविंद केजरीवाल यांनी गुजरात निवडणुकीसाठी केलेली रणनीती आता कोलमडण्याची शक्यता आहे.

हेही वाचा – तरुणांना 20 लाख नोकर्‍या, विद्यार्थिनींना स्कुटी; गुजरात निवडणुकीसाठी भाजपचा जाहीरनामा

आपमध्ये झालेली ही बंडखोरी पहिलीच नाहीय. याआधीही सुरत पूर्व विधानसभा मतदारसंघात कंचन जरीवाला यांनी आपली उमेदवारी मागे घेतली होती. त्यामुळे सुरत पूर्व विधानसभा मतदारसंघातून आपला उमेदवार उभा करता आला नाही. याप्रकरणी दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोसीया यांनी निवडणूक आयोगाच्या कार्यालयात धरणे आंदोलन केले होते. आता वसंत खेतानी यांनीही उमेदवारी मागे घेतल्याने या मतदारसंघातून आप दुसरा उमेदवार जाहीर करू शकत नाही.

गुजरातमध्ये १८२ जागांसाठी १ आणि ५ डिसेंबर रोजी दोन टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे. या मतदानाचा निकाल ८ डिसेंबर रोजी लागणार आहे. त्यासाठी उमेदावारी मागे घेण्याचा तारीख उलटून गेल्याने आप आता दुसरा उमेदवार जाहीर करू शकत नाही.

हेही वाचा गुजरातच्या ‘या’ गावात निवडणुकीच्या प्रचारसभांना मनाई, मतदान न केल्यास होते दंडात्मक कारवाई

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -