घरलाईफस्टाईलRecipe : उरलेल्या भातापासून बनवा चटपटीत फ्राइड राइस

Recipe : उरलेल्या भातापासून बनवा चटपटीत फ्राइड राइस

Subscribe

चायनिज फ्राईड राईस ही जगातील एकमेव अशी डीश आहे जी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडते. पण यासाठी प्रत्येकवेळी हॉटेलमध्ये ऑर्डर देणे गरजेचे नाही तर तुम्ही घरातही फ्राईड राईस बनवू शकता. बऱ्याचवेळा रात्रीचा भात उरतो. अशावेळी नेहमी फोडणीचा भात बनवण्यापेक्षा तुम्ही या उरलेल्या भातापासून फ्राईड राईसही बनवू शकता.

साहीत्य :

- Advertisement -
  • 1 कप शिजवलेला भात
  • 1 कप उभा पातळ चिरलेला कांदा
  • 1 चमचा आलं लसूण पेस्ट
  • 1 कप उभा चिरलेले गाजर
  • 1/2 चमचा लाल तिखट
  • 1/2 चमचा चिली फ्लॅक्स
  • 1/2 चमचा व्हिनेगर
  • 1 चमचा चिरलेली फरसबी
  • 1 चमचा चिरलेला कोबी
  • 1 चमचा टॉमेटो सॉस
  • तेल आवश्यकतेनुसार
  • चवीनुसार मीठ

कृती :

  • सर्वप्रथम एका फ्रायपॅनमध्ये तेल गरम करुन घ्यावे.
  • नंतर त्यात कांदाआणि आलं लसून पेस्ट टाका.
  • कांदा लालसर झाला कि त्यात गाजर, फरसबी, कोबी टाकून 3-4 मिनिट परता.
  • त्यानंतर त्यात तिखट, चिल्ली फ्लॅक्स, फ्राईड राईस मसाला , सॉस व्हिनेगर टाका. मीठ टाकून मिश्रण परता.
  • फ्राईड राईस सर्वांना सर्व्ह करा.

हेही वाचा :

आता तेलकट समोश्याला म्हणा बाय बाय; ट्राय करा बेक समोसा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -