घरमहाराष्ट्रआमदार वैभव नाईक यांची 9 डिसेंबरला पुन्हा एसीबीकडून चौकशी

आमदार वैभव नाईक यांची 9 डिसेंबरला पुन्हा एसीबीकडून चौकशी

Subscribe

बेहिशेबी संपत्तीच्या कारणावरून आज रत्नागिरी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून (ACB) आज ठाकरे गटाचे कुडाळ मालवण मतदार संघाचे आमदार वैभव नाईक यांची जवळपास साडेचार तास चौकशी केली. यानंतर आता 9 डिसेंबरला त्यांना पुन्हा एसीबीकडून चौकशीसाठी बोलवण्यात आले आहे. या चौकशीनंतर वैभव नाईक यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे.

वैभव नाईक म्हणाले की, माझी 20 वर्षांतील जी माहिती माझ्याकडे होती ती प्राथमिक स्वरुपात माहिती एसीबीला दिली आहे. उरलेली माहिती मी कागदपत्रांच्या स्वरुपात सादर करतो असे सांगितले आहे. यानंतर 9 डिसेंबरला पुन्हा मला चौकशीसाठी बोलवण्यात आले आहे, तेव्हा मी उरलेली कागदपत्र सादर करेन. 20 वर्षांपूर्वीचा बँकेचा रेकॉर्ड शोधणं काम सुरु आहे. मात्र आज जेवढी माहिती माझ्याकडे होती तेवढी प्राथमिक पेक्षा जास्त माहिती मी दिली आहे.

- Advertisement -

दरम्यान 5 डिसेंबरपूर्वी झालेल्या चौकशीत एसीबीने वैभव नाईक यांच्याकडे 2002 ते 2022 पर्यंतच्या सर्व उत्पन्न आणि खर्चाचा तपशील मागवला होता. तसेच 5 डिसेंबरच्या चौकशीसाठी येताना सर्व कागदपत्रांसह जबाब नोंदवण्यासाठी यावे, असे आदेश एसीबीने दिले होते, त्यानुसार आज वैभव नाईक त्यांच्याकडील कागदपत्रांसह आज सकाळी 11 वाजता रत्नागिरीच्या एसीबी कार्यालयात झाले. मात्र एसीबीला अपेक्षिक सर्व कागदपत्र सादर न झाल्याने आता पुन्हा 9 डिसेंबरला त्यांना पुन्हा चौकशीस हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. बेहिशेबी मालमत्तेप्रकरण आमदार वैभव नाईक यांना एसीबीने गेल्या महिन्यात नोटीस पाठवली होती. त्यांच्यासह त्यांची पत्नी आणि भावालाही नोटीस पाठवण्यात आली आहे.


महाराष्ट्राच्या स्वाभिमानी परंपरेला शिंदे-फडणवीस सरकारने मातीमोल केले, बेळगाव रद्द दौऱ्यावर राष्ट्रवादीचा संताप

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -