घरदेश-विदेशCovid-19 : लसीकरण करून घ्या अन् गर्दीच्या ठिकाणी मास्कही वापरा, केंद्र सरकारचे...

Covid-19 : लसीकरण करून घ्या अन् गर्दीच्या ठिकाणी मास्कही वापरा, केंद्र सरकारचे आवाहन

Subscribe

नवी दिल्ली : चीनसह इतर काही देशांमध्ये कोविड-19 संसर्ग झपाट्याने वाढत आहे. यापार्श्वभूमीवर, दर आठवड्याला कोविड परिस्थितीबाबत आढावा बैठक घेण्याचा केंद्र सरकारने घेतला आहे. याशिवाय, ज्यांचे लसीकरण अद्याप बाकी आहे, त्यांनी ते करून घ्यावे आणि गर्दीच्या ठिकाणी मास्कचा वापर करावा, असे आवाहनही केंद्र सरकारने केले आहे.

जगभरात कोरोनाची दहशत पुन्हा एकदा निर्माण झाली आहे. चीनबरोबरच अर्जेंटिना, ब्राझील आणि जपानमध्येही कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. विविध देशांमध्ये आठवड्याभरात कोरोनाचे तब्बल 36,32,109 रुग्ण आढळले आहेत. देशातील कोविडच्या ताज्या स्थितीचा आढावा घेण्यासाठी बुधवारी केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी तज्ज्ञांसोबत बैठक घेतली. कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज असून कोविड परिस्थितीबाबत दर आठवड्याला आरोग्य मंत्रालयात आढावा बैठक घेण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.

- Advertisement -

https://publish.twitter.com/?query=https%3A%2F%2Ftwitter.com%2FANI%2Fstatus%2F1605481172619866112&widget=Tweet

या बैठकीनंतर नीति आयोगाचे सदस्य (आरोग्य) व्ही. के. पॉल यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधत या बैठकीची माहिती दिली. ते म्हणाले की, कोरोना अद्याप संपलेला नाही. कोरोनाचा फैलाव इतर देशांत होत असला तरी, याला घाबरण्याची गरज नाही. तथापि, गर्दीच्या ठिकाणी लोकांनी मास्क वापरावा. पुरेशा प्रमाणात टेस्टिंगची सुविधा आहे. त्यामुळे वेळीच टेस्ट करून घ्यावी आणि त्यानुसार उपाय करावेत, असे आवाहन त्यांनी केले. यादरम्यान, काय उपाययोजना करायच्या याचा निर्णय केंद्रीय आरोग्य मंत्रालय घेईल, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.

- Advertisement -

चीनमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढले आहेत, मात्र आम्ही कोरोनाबाबत सतर्क आहोत. बैठकीत चीनच्या नवीन कोरोना व्हेरिएंटवरही चर्चा झाली, असे सांगून व्ही. के. पॉल म्हणाले, देशातील 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या प्रत्येकाला कोरोना प्रतिबंधक प्रिकॉशन डोस मिळायला हवा. केवळ 27 ते 28 टक्के लोकांनी प्रिकॉशन डोस घेतला आहे. इतरांनी देखील, विशेषत: ज्येष्ठ नागरिकांनी प्रिकॉशन डोस घ्यावे, असे आमचे आवाहन असल्याचे त्यांनी सांगितले.

गर्दीत शक्यतो मास्क वापरावा आणि सोशल डिस्टन्सिंगचीही काळजी घ्यावी लागेल. ज्येष्ठ नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी. आवश्यक असल्यास, मार्गदर्शक तत्त्वांमध्ये सुधारणा करण्यात येईल. मात्र तूर्तास तरी, कोरोनासंदर्भात विद्यमान मार्गदर्शक तत्त्वांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

भारतात दिलासादायक चित्र
या बैठकीत एका सादरीकरणाद्वारे केंद्रीय आरोग्य मंत्र्यांना भारतात 19 डिसेंबर 2022ला संपलेल्या आठवड्यात दैनंदिन रुग्णाच्या संख्येत नियमित गतीने घट होत असल्याची आणि ही संख्या दिवसाला सरासरी 158पर्यंत खाली आल्याची माहिती देण्यात आली. मात्र, गेल्या 6 आठवड्यांपासून जागतिक दैनंदिन सरासरीमध्ये निरंतर वाढीची नोंद झाली असून 19 डिसेंबरला संपलेल्या आठवड्यात दररोज सरासरी 5.9 लाखांपर्यंत नव्या रुग्णांची नोंद होत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -