घरठाणेकुत्र्याच्या हल्ल्यात चिमुकली गंभीर जखमी

कुत्र्याच्या हल्ल्यात चिमुकली गंभीर जखमी

Subscribe

भिवंडी । भिवंडी शहरात भटक्या कुत्र्यांचा वावर वाढला असून या मोकाट कुत्र्यांकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. पद्मानगर परिसरातील तीन वर्षीय चिमुरडीला पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेऊन गंभीर जखमी केल्याची घटना सोमवारी घडली आहे. कुत्र्याच्या हल्ल्यात मुलगी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान पद्मानगर परिसरासह शहरातील भटक्या मोकाट कुत्र्यांवर मनपा प्रशासनाने योग्य ती कारवाई करावी अशी मागणी भाजपचे शहराध्यक्ष तथा माजी नगरसेवक संतोष शेट्टी यांनी मनपा प्रशासनाकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

चांदनीकुमारी (3) असे पिसाळलेल्या कुत्र्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तीन वर्षीय चिमुरडीचे नाव आहे. पद्मानगर येथील राजूचाळ परिसरात खेळत असताना तिच्यावर कुत्र्याने हल्ला केला. या हल्ल्यात ती गंभीर जखमी झाली आहे. पद्मानगर येथे मोठया प्रमाणात मोकाट, भटक्या प्राण्यांचा वावर असून मागील दोन महिन्यापासून राजुचाळ परिसरात एका भटक्या पिसाळलेल्या कुत्र्याने थैमान घातलेले होते. हा पिसाळलेला कुत्रा दिवसरात्र परिसरातील लहान मुले शाळेतील विद्यार्थी महिला, ज्येष्ठ नागरीकांच्या अंगावर जावून चावा घेण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. त्यामुळे परिसरात या भटक्या कुत्र्यांची दहशत पसरली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -